कासवाला कवच मिळाले | पुढारी | पुढारी

कासवाला कवच मिळाले | पुढारी

कथा

को णे एकेकाळी संपूर्ण पृथ्वी दुष्काळाने होरपळून निघाली होती. त्या काळात स्वर्गातील देवांनी पृथ्वीवरील सजीवांना मेजवानीचे आमंत्रण दिले. यामुळे पक्ष्यांना फार आनंद झाला. कारण केवळ तेच उडून आकाशात जाऊ शकत होते. कासवाने  मेजवानीला उपस्थित रहायचे ठरविले. पण तो उडणार कसा? “आपण कासवाच्या पायांना पक्ष्यांची पिसे लावू, मग तो उडू शकेल.’’ बुद्धिमान घुबड म्हणाले. घुबड व पोपटाने जेवढी मिळतील तेवढी पिसे गोळा केली व कासवाच्या पायाला बांधली. 

“स्वर्गातील देवांना सांगा की मी सर्व पक्ष्यांचा राजा आहे.’’ कासवाने हवेत उडत असताना पक्ष्यांना विनंती केली. स्वर्गात पोहोचल्यावर सर्व पक्ष्यांचे देवांनी स्वागत केले व त्यांना मेजवानीच्या टेबलावर नेले. कासवाने अधाशीपणाने मेजवानीतील बहुतांश पक्वान्ने फस्त केली. पक्ष्यांसाठी थोडेच अन्न ठेवले. सर्व पक्षी यामुळे संतप्त झाले. त्यांनी कासवाच्या पायांवरील पिसे काढून घेतली. कासवाने मग आपल्या पत्नीला मऊ गवताचे आवरण जमिनीवर तयार ठेवण्यास स्वर्गातून मोठ्याने ओरडून सांगितले.

संबंधित बातम्या

जेणेकरून स्वर्गातून खाली जमिनीवर पडल्यावर त्याला दुखापत होणार नाही. मात्र कासवीण बाईने गवताऐवजी दगड शब्द ऐकला. तिने दगडांचे आवरण बनविले. कासव स्वर्गातून जमिनीवर धप्पदिशी दगडांवर पडला. त्याचे एकसंध कवच तुटले व त्याचे अनेक तुकडे झाले. कासविणीने कसेबसे ते तुकडे गोळा केले व कासवाच्या पाठीवर चिकटवले. तेव्हापासून कासवांचे कवच कधीही एकसंध नसते 
 

Back to top button