क्रांतिकारक शोध : फिल्म प्रोजेक्टर | पुढारी

क्रांतिकारक शोध : फिल्म प्रोजेक्टर

फिल्म प्रोजेक्टरचा इतिहास मोठा रंजक आहे. अनेक लोकांनी हलती चित्रे पडद्यावर दाखवू शकेल, असे यंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश छायाचित्रकार एडवर्ड मुयब्रिजने 1879 साली बनवलेला झूप्रास्किस्कोप, पोलंडच्या प्राझीमिर्झ प्रोझिन्स्कीचा प्‍लिओग्राफ, फ्रेंचमन लुईस ली प्रिन्सचा प्रोजेक्टर ही यंत्रे सर्व कमी- अधिक प्रमाणात यशस्वी ठरली. पहिला यशस्वी फिल्म प्रोजेक्टर फ्रान्सच्या ऑगस्ट व लुईस या दोन ल्युमिअर बंधूंनी बनवला. त्यांच्या वडिलांचा फोटो स्टुडिओ होता. एमिल रेयनॉड व लिऑन बाउटी या दोन संशोधकांच्या प्रोजेक्टर यंत्रांत सुधारणा करून ल्युमिअर बंधूंनी 13 फेबुवारी 1895 साली त्यांच्या प्रोजेक्टरचे पेटंट घेतले. त्यांच्याच कारखान्यातील कामगारांचे चित्रण या प्रोजेक्टरवर करून ल्युमिअर बंधूंनी पॅरिसच्या प्रसिद्ध सलोन ग्रँड कॅफेत त्यांची पहिली फिल्म दाखवली. आज या घटनेला सव्वाशे वर्षे उलटून गेली आहेत. डिजिटल क्रांतीनंतर जुन्या फिल्म प्रोजेक्टरची सद्दी संपली असली तरी अनेक वर्षे फिल्म प्रोजेक्टरने मनोरंजनाच्या क्षेत्रात वर्चस्व गाजवले. आज सॅटेलाईटद्वारे थेट चित्रपटगृहात चित्रपटाचे प्रक्षेपण केले जाते. यामुळे आज फिल्म प्रोजेक्टरची तशी गरज नसली तरी हा एक महत्त्वाचा शोध होता, हे नक्‍की.

Back to top button