भारत दर्शन : मिझोराम | पुढारी | पुढारी

भारत दर्शन : मिझोराम | पुढारी

भारताच्या ईशान्येकडील ‘सात बहिणी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राज्यांपैकी एक असलेले मिझोराम देशातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले दुसर्‍या क्रमांकाचे राज्य आहे. मिझो जमातीची भूमी असलेले मिझोराम आसाम राज्याचा एक भाग होता. 20 फेब्रुवारी 1987 रोजी मिझोराम स्वतंत्र राज्य बनले. 

हे राज्य ओळखले जाते ते ‘झूम’ नावाच्या अनोख्या शेतीसाठी व आदिवासींच्या नृत्य प्रकारांसाठी. सुमारे 91 टक्के जमीन जंगलाने व्याप्‍त असलेल्या या राज्यात पर्वत व दर्‍या सर्वत्र आढळतात. बहुतांश लोक पर्वतीय भागात उंचावर राहतात. ‘मि’ या शब्दाचा अर्थ ‘लोक’ व ‘झो’ या शब्दाचा अर्थ आहे ‘पर्वत’ व ‘राम’ म्हणजे ‘भूमी.’ ‘पर्वतावर राहणार्‍या लोकांची भूमी’ म्हणजे ‘मिझोराम.’

पंधराव्या शतकात शेजारच्या देशातून येथे अनेक आदिवासी जमाती आल्या व स्थिरावल्या. बांबूची शेती येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते. केरळनंतर देशातील सर्वात सुशिक्षित राज्य असा या राज्याचा लौकिक आहे. पलक जलाशय, टांवांग जलप्रपात, लुंगमुल हँडीक्राफ्ट सेंटर ही येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. 

संबंधित बातम्या

चाई, चेरा, खुल्‍लम व चेल्‍लम हे येथील लोकप्रिय नृत्यप्रकार आहेत.

Back to top button