ज्ञानात भर : अननसापासून कृत्रिम चामडे | पुढारी

ज्ञानात भर : अननसापासून कृत्रिम चामडे

मानव चामड्याचा वापर आदिम युगापासून वस्त्र व अन्य वस्तू बनवण्यासाठी करत आहे. आधुनिक काळात पर्यावरण व प्राणी संरक्षणाच्या द‍ृष्टीने चामड्याचा वापर मर्यादित झाला आहे. 

चामड्यापासून बनवलेल्या वस्तू महागही असतात. यावर उपाय म्हणून कार्मेन हिजोसा नावाच्या स्पॅनिश डिझायनर महिलेने आठ वर्षे संशोधन करून अननसाच्या पानांपासून कृत्रिम चामडे बनवण्यात यश मिळवले आहे. हे कृत्रिम चामडे खर्‍या चामड्याप्रमाणे मजबूत, लवचिक व आकर्षक असून फॅशन इंडस्ट्रीमध्ये या कृत्रिम चामड्याचा वापर केला जात आहे. या कृत्रिम चामड्याचे नाव ‘पिनाटेक्स’ आहे.

संबंधित बातम्या
Back to top button