भारत दर्शन | पुढारी | पुढारी

भारत दर्शन | पुढारी

किलीमांजारो हे पर्वत शिखर आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर मानले जाते. हे शिखर सर करणे पट्टीच्या गिर्यारोहकालाच जमते. अकोला जिल्ह्यातील अकोटच्या धीरज कळसाईत या दिव्यांग तरुणाने 26 जानेवारीला हे शिखर सर करत तेथे तिरंगा फडकावला. एक हात व एका पायाने पूर्णत: अपंग असलेल्या धीरजने समुद्र सपाटीपासून 19 हजार 341 फूट उंच असलेल्या या शिखरावर जेव्हा तिरंगा फडकावला तेव्हा असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय दिव्यांग गिर्यारोहक ठरला.

जन्मत:च डाव्या हाताने अपंग असलेल्या धीरजला जागतिक अपंगदिनी एका अपघातामुळे डावा पायही गमवावा लागला. तरी या धीराच्या तरुणाने अपंगत्वावर मात करत नरनाळा, पावनखिंड, कळसूबाई, लिंगाणा, सुधागड अशी शिखरे सर केली. माऊंट किलीमांजारो सर करत त्याने आपल्या यशोगाथेत मोलाची भर टाकली. या तरुणाला आता जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट खुणावते आहे.

 

संबंधित बातम्या
Back to top button