Goddess Durga : दुर्ग नावाच्या राक्षसाला मारणारी म्हणून ‘दुर्गा’ | पुढारी

Goddess Durga : दुर्ग नावाच्या राक्षसाला मारणारी म्हणून 'दुर्गा'

प्रसिद्ध शक्तीदेवता. दुर्ग नावाच्या राक्षसाला मारणारी म्हणून दुर्गा. नऊ वर्षाच्या शक्तिदेवीला दुर्गा म्हणावे असे देवी भागवतात (३·२६) म्हटले आहे. ही उमा, गौरी, पार्वती, चंडी, काली इ. रूपांनी ओळखली जाते. (Goddess Durga) ते शंकर, यम, विष्णू,णूचंद्र, इंद्र, वरुण, भूमी सूर्य इ. देवतांच्या अंशांपासून दुर्गेचा जन्म झाला, असे मार्कंडे पुराणात म्हटले आहे. महाभारताच्या विराटपर्वात (अध्याय ६) दुर्गा नारायणाची स्त्री असल्याचे म्हटले आहे. महाभारतात (भीमपर्व २३) दुर्गा देवीचे एक स्तोत्र आहे. या देवीचे स्थान विंध्य पर्वतावर असल्याचे हरिवंशात म्हटले आहे. त्यावरून या देवीला विंध्यवासिनी असेही म्हणतात. दुर्गेचा संबंध शंकराशी जोडला असून तिला आदिशक्ती असे म्हटले आहे. ‘नवदुर्गा’ नावाचे एक स्तोत्र असून त्यात दुर्गेच्या नऊ रूपांची वर्णने आहेत. आगमग्रंथात नवदुर्गांची नावे दिलेली आहेत. (Goddess Durga)

मार्कंडेय पुराणात (अध्याय ८१–९३) देवीमाहात्म्य आले असून त्यातील श्लोकांची संख्या ७०० असल्यामुळे हा भाग‘दुर्गा सप्तशती’
या नावाने प्रसिद्ध आहे. यात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तीन स्वरूपात दुर्गेचे चरित्र वर्णन केले आहे. ही तीन रूपे
अनुक्रनुमे तम, रज व सत्त्व या तीन गुणांची प्रतीके आहेत. मधुकैटभ, महिषासुर, चंडमुंडमुं, शुंभनिशुंभ इ. राक्षसांचा तिने आपल्या
पराक्रमाने वध केल्याच्या कथा यात सांगितल्या आहेत. दुर्गेने देवांना उत्पन्न केले, सर्व विद्या दुर्गा स्वरूप आहेत, ती ओंकाररूप आहे, जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा दुर्गा अवतार घेते, असेही वर्णन तेथे आढळते.

दुर्गा देवीने हा पराक्रम आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवसांत केला म्हणून नवरात्रात दुर्गा देवीचा मोठा उत्सव करतात.

दुर्गेला चंडी असेही दुसरे नाव आहे, म्हणून दुर्गासप्तशतीच्या पाठास ‘चंडीपाठ’ असे म्हणतात. सप्तशतीचा पाठ करून हवन
करण्याची पद्धती आहे. शतचंडी, सहस्रचंडी अशा मोठ्या संख्येनीही सप्तशतीचा पाठ करतात. दुर्गेच्या उपासनेत पशुबशुलीही
सांगितला आहे. दुर्गेच्या पूजेचे विधान देवीभागवत, देवीपुराण, कालिकापुराण तसेच इतर पुराणांतही आढळून येते. ते प्रत्येक महिन्याच्या शुद्ध अष्टमीस दुर्गाष्टमी म्हणतात. या दिवशी स्त्रिया व्रत करतात. आश्विन महिन्यातील दुर्गाष्टमीला महाअष्टमी म्हणतात. त्या दिवशी महालक्ष्मीची पूजा, चंडीपाठ, जागरण इ. अनेक विधी करावयाचे असतात. नवरात्रोत्सवात दुर्गा पूजेला एक महत्त्वाचे स्थान आहे. दूर्गा पूजेच्या अनेक पद्धती भारतातील वेगवेगळ्या प्रांतात प्रचलित आहेत.

दुर्गेची रौद्र व सौम्य अशी दोन्ही रूपे आहेत. रौद्ररूपात ती तांत्रिकाची उपास्य देवता ठरली. दुर्गेचे अध्यात्मरूप म्हणजे सौम्यरूप देव्युपयु निषदात वर्णिले आहे. दुर्गा पुष्कळवेळा शक्तिरूपातच प्रकट झालेली आहे. कोलकात्यात दुर्गा ही काली आहे. तर गोमंतकात ती शांता आहे. चंडी या स्वरूपात दुर्गा ही चतुर्भुजा, अष्टभुजा, दशभुजा, अष्टादशभुजा अशी आढळते. ते तिच्या हातांत चक्र, पाश, शूल, खड्ग इ. आयुधे असतात. ही सिंहारूढ असते. ते सुप्रसुभेदागमानुसार दुर्गा ही विष्णूची धाकटी बहीण असून ती आदिशक्ती आहे. जेव्हा ती अष्टभुजा असते, ते तेव्हा तिच्या हातात शंख, चक्र, शूल , धनुष, बाण, खड्ग, खेटक (गदा) व पाश ही आयुधे असतात. दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांतील मूर्ती आढळून येतात. महिषासुरमसुर्दिनीच्या रूपात तिच्या पायाजवळ शिर तुटतुलेला महिषासुर असतो आणि त्याच्या मानेपासूनसू जन्मलेला पुरुष दाखविलेला असतो.

Back to top button