‘उन्हाळ्यात जीन्स नकोच’, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात! | पुढारी

'उन्हाळ्यात जीन्स नकोच', वाचा तज्ज्ञ काय म्हणतात!

पुढारी ऑनलाईन : अनेकांना उन्हाळ्यात उष्माघात किंवा शरीरात पाणी कमी पडल्याने डिहायड्रेशनचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात काय खावं-काय प्यावं यासोबतच कोणती आणि कशा प्रकारची कपडे घालावी, हे तज्ज्ञांकडून समजून घेणे गरजेचे ठरते. अनेकजण या दिवसात जीन्‍स वापरतात, पण या दिवसात जीन्स वापरणे म्हणजे त्वचारोगाला आमंत्रणच (Avoid jeans in summer) आहे. चला तर जाणून घेऊया यावर काय आहे तज्ज्ञांचे मत याविषयी.

त्वचेची समस्या उद्भवू शकते

तज्ज्ञांच्या मते,”जिन्स तुम्हाला वापरायला सहज, सोपी आणि दिसायला आकर्षक वाटत असली तरी उन्हाळ्यात यामुळे आरोग्‍याच्‍या  समस्या निर्माण होण्‍याची शक्‍यता असते. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात उष्णता असल्‍याने अधिक घाम येतो. अशातच स्किन टाईट डेनिम, जीन्स घातल्याने त्वचेची समस्या (Avoid jeans in summer) उद्भवू शकते. यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.”

जिन्सच्या डेनिम कापडातील घामातून बाहेर पडलेले विषाणू ज[न्स धुतली तरी सहजासहजी मारले जात नाहीत. ९० टक्के फंगल इन्फेक्शनची प्रकरणे ही जांघेत आणि कमरेच्या भागात आढळून येतात. टाईट जिन्स (Avoid jeans in summer) वापरल्याने याप्रकारची त्वचा समस्येची प्रकरणे समोर येतात, असे देखील तज्ज्ञ सांगतात.

जीन्स वारंवार नियमित धुतली जात नाही. यामुळे त्वचारोगाची समस्या आणखी वाढते. जीन्‍स नियमित धुतली आणि उलटी करून सुकवली तरी देखील काहीप्रमाणात त्वचेची समस्या उद्भवू शकते. पबमेड नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, एकदा जीन्स धुतल्यानंतर देखील वापरण्यात येणाऱ्या डेनिम कापडावर फंगलचे विषाणू कायम राहतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्य तितक्या प्रमाणात जीन्स टाळणे, हे आरोग्यदायी ठरू शकते, असे डॉक्‍टर सांगतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Times of India (@timesofindia)

हेही वाचा:

Back to top button