आजचे राशिभविष्य (२१ एप्रिल २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (२१ एप्रिल २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष : विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मध्येमध्ये थोडा आराम करा. अनेक समस्या निर्माण होतील. मात्र, मनावर ताबा ठेवा.
वृषभ
वृषभ
वृषभ : अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा; अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन : जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे अन्य कामे थांबतील; पण काळजी करण्याचे काही कारण नाही. कारण, नंतर अन्य कामेही मार्गी लागतील.
कर्क
कर्क
कर्क : व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल.
सिंह
सिंह
सिंह : पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. घराच्या द़ृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या : परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ नका, त्याचा सामना करा तरच त्यातून काहीतरी मार्ग निघेल. मनावर ताबा ठेवा.
तुळ
तुळ
तूळ : संपूर्ण कुटुंबासाठी समृद्धीचे ठरतील, असे प्रकल्प हाती घ्यायला हवेत. प्रिय व्यक्तीसोबत काही मतभेद होतील. बोलताना विचार करून बोला.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक : आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचा चांगला वापर करा. गुंतवणूक करणे टाळा. एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता.
राशिभविष्य
धनु
धनु : एकमेकांचा द़ृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. समस्या चव्हाट्यावर आणू नका; अन्यथा बदनामी होण्याची शक्यता.
मकर
मकर
मकर : इतरांवर टीका करण्यात वेळ वाया घालवू नका, त्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल.
कुंभ
कुंभ
कुंभ : संयम बाळगा, निरंतर प्रयत्नांमुळे हमखास यशप्राप्ती होईल. समोर येणारे गुंतवणुकीचे नवे पर्याय धुंडाळा. ते भविष्यासाठी फायदेशीर ठरतील.
मीन
मीन
मीन : गुंतवणूक लाभदायक असेल, भागीदाराकडून सहकार्य मिळेल. आर्थिक आवक चांगली होईल.

 

Back to top button