Mirachicha Thecha : आजीची रेसिपी असलेला झणझणीत हिरव्या मिरच्यांचा ठेचा | पुढारी

Mirachicha Thecha : आजीची रेसिपी असलेला झणझणीत हिरव्या मिरच्यांचा ठेचा

पुढारी ऑनलाईन डेस्क : उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा कोणताही ऋतू असो प्रत्येकालाच झणझणीत आणि चटपटीत खाण्याचा मोह असतो. यासाठी मग कधी- कधी पिझ्झा, बर्गर रेस्टॉरंटमधून ऑर्डर देऊन या पदार्थाची चव चाखली जाते. कधी-कधी घरातील बनवलेली भाजी संपते किंवा लांबच्या प्रवासाला जाताना कोणता पदार्थ सोबत घेऊन जायचा हाही प्रश्न पडतो. अशा वेळी पाच मिनिटांत तयार होणारा आजीची रेसीपी असलेला हिरव्या मिरच्यांचा ठेचाच उपयोगी पडतो. पाहूयात तो कसा बनवायचा… ( Mirachicha Thecha)

साहित्य-

हिरव्या मिरच्या १०-१५
लसूण- छोटे दोन गड्डे
शेंगदाणे- अर्धा कप
जिरे- १ चमचा
कोथिंबीर- अर्धा कप
मीठ- चवीनुसार
तेल- फोडणीसाठी
लिंबूचा रस- अर्धा चमचा

कृती-

१. पहिल्यांदा शेतातून किंवा बाजारातून हिरव्या मिरच्या आणाव्यात.

२. हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे मधोमध दोन तुकडे करावेत.

३. यानंतर गॅसवर तवा तापण्यास ठेवावा.

४ तापलेल्या तव्यावर हिरव्या मिरचे तुकडे घालून चांगले भाजून घ्यावे.

५. भाजलेल्या मिरचीमध्ये अर्धा चमचा तेल, अर्धा कप शेंगदाणे, लसूण, मीठ, जिरे घालून चांगले परतवून घ्यावे. ( टिप- हे मिश्रण भाजताना तापलेल्या मिरच्या फुटून अंगावर येणार नाहीत यांची काळजी घ्यावी.)

६. यानंतर हे मिश्रण आजीच्या पाट्या- वरंवट्याने बारीक वाटून घ्यावे आणि त्यावर बारिक चिरलेली कोंथबिर आणि लिंबूचा रस घालावा. (टिप- पाटा- वरंवटा नसेल तर मिक्सरमध्ये मिश्रणमध्ये वाटले तरी चालते.)

७. यानंतर तयार झालेला ठेचा किंवा खर्डा भाकरी आणि चपातीसोबत केव्हाही खाता येईल. (Mirachicha Thecha )

ठेचा (Thecha Recipe In Marathi) रेसिपी Poonam Ghule द्वारे - Cookpad

हेही वाचा : 

Back to top button