Weight Loss Recipe : सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘दालचिनीचा चहा’ | पुढारी

Weight Loss Recipe : सकाळी रिकाम्या पोटी प्या 'दालचिनीचा चहा'

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध होणारा मसाला म्हणजे दालचिनी. स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या दालचिनीला कलमी असंही म्हणतात. (Weight Loss Recipe) दालचिनीचा उपयोग पदार्थांमध्ये स्वादच वाढवायला नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तुमचे वजन जर वाढले असेल तर वजन कमी करण्यासाठी दालचिनीचा वापर करण्यास सांगितले जाते. यासाठी दालचिनीचा चहा सर्वात उत्तम उपाय आहे. (Weight Loss Recipe)

दालचिनीच्या झाडाची साल आपण स्वयंपाकात वापरतो तर याच्या झाडांच्या पानांचा उपयोग तमालपत्रे म्हणून केला जातो. ही तमालपत्रे आपण मसालेभातामध्ये सुगंध आणि चवीसाठी वापरतो. दालचिनी दोन प्रकारच्या आढळतात. एक कॅशिया किंवा सिनॅमोमम कॅसिया या वनस्पतीच्या सुकवलेल्या सालीला दालचिनी म्हणतात. दुसरी सिलोनी दालचिनी. आपण सिलोनी दालचिनी झाडाची साल काढताना गोल गोल गुंडाळून काढली जाते. ही भूसभूशीत असून तिची सहज पावडर बनवता येते. दोन्हीमध्ये चव, वास सारखाच असतो.

असा बनवा दालचिनी चहा

घरामध्ये आपण जी स्वयंपाकात वापरतो, जी फक्त तुकडे किंवा कांड्या असते, ती दालचिनी वेट लॉस रेसिपीसाठी घ्यायची आहे. ज्यांनी कमी रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी याचा अतिवापर करू नये. दालचिनी घेऊन ती मिक्सरमध्ये फिरवून घ्या. बारीक पूड होईपर्यंत दालिचिनीची पूड करा. एका बरणीमद्ये ही पावडर भरून ठेवा. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी २ कप पाणी उकळा, त्यामध्ये सपाट टीस्पून पावडर घाला. पाणी चांगले उकळून घ्या. दालचिनी आणि पाणी एकजीव झाल्यानंतर लालसर किंवा तांबूस रंग येतो, त्यानंतर गॅस बंद करा. पाणी कोमट होऊ द्या. नंतर गाळणीने गाळून चहा पितो तसे थोडे थोडे प्या. यामध्ये तुम्ही थोडे लिंबू पिळू शकता किंवा मधही घालू शकता. यानंतर किमान अर्धा तास इतर कोणताही पदार्थ खाऊ नये.

वजन कमी करताना दालचिनीच्या चहाचा प्रमाणात वापर करावा. अतिसेवन करू नये. शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे. दालचिनीच्या सेवनाने मेटाबॉलिझम चांगले होते.

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?