पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण एखाद्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं की, वेशभूषेसोबत नटापट्टा आणि थाट एक वेगळाच असतो. काही वेळा इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी अनेक प्रकारच्या वेशभूषेसोबत अनेक सौंदर्य प्रसादधानांचा वापर केला जातो. अशावेळी आपल्या दातांचेही सौंदर्य तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमात हजेरी लावतो तेव्हा अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. जर समोरच्या व्यक्तीला दात पिवळेपणा दिसला तर लगेच तो व्यक्ती बोलणे टाळतो आणि आपल्याला इग्नोर करताना दिसतो. आपल्यालाही खिजल्यासारखे वाटते. त्यावेळी आपण बाहेरून सुंदर असून काहीच उपयोग नसतो. समोरच्या व्यक्तीने इग्नोर केल्याने मन दुखावते. तर काहीवेळा आपण कार्यक्रमातून निराश होवून परतदेखील जातो. आणि डॉक्टराकडे जावून दातांचा पिवळेपणा कसा कमी करता येईल हे पाहतो. दरम्यान जर घरच्या घरी दातांचा पिवळेपणा दूर करता आला तर किती सोपे होईल. ( Teeth Whitening Tips )
पांढरेशुभ्र आणि चमकणारे दात कुणाला नको असतात. दात हे तुमचे व्यक्तीमत्व आणखी आकर्षक करणारे ठरतात. लोक पिवळ्या दातामुळे इतरांसमोर हासणे टाळतात. तर कधी तोंडावर हात ठेवून बोलत असतात. दात पिवळे होण्याची अनेक कारणे आहेत. यात वय वाढणे, व्यसन करणे, दातांची स्वच्छता न ठेवणे, चहा- कॉफीची अधिक सवय असणे यामुळे दात पिवळे होतात. खरं तर पिवळ्या दातांना पांढरेशुभ्र करणे खूपच सोपे आहे.
आपल्या आजूबाजूला आंब्याची झाडे असतात. आंब्याच्या झाडाच्या पानांचा वापर करून दांताचा पिवळेपणा आणि डाग घालवता येतो. पहिल्यांदा आंब्याच्या झाडांची मध्यम आकाराची दोन पाने घ्यावीत. ही पाने मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवावीत. यानंतर ती दांतांनी चावून त्याची तोंडात पेस्ट करावी आणि नंतर ती थूकून द्यावी. असे आडवड्यातून दोन -तीन वेळा केल्यास दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. (टिप- आंब्याची पाने घेताना कोवळी किंवा फार जुन असणारी घेवू नयेत. तर आवश्यक असल्यास तोडातील पेस्ट गिळली किंवा थुंकली तरी चालते.
एक चमचा ॲक्टिव्हेटेड चारकोल पावडर घेवून त्यात एक चमचा नारळाचे तेल घालून पेस्ट तयार करा. तयार झालेली पेस्ट दररोज सकाळी ब्रशवर घेवून दात घासावे यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते.
एक चमचा एँक्टिव्हेटेड चारकोल पावडर घेवून त्यात घरातील वापरात असणारी कोणताही टूथपेस्ट घालून त्याची पेस्ट बनवा, ही पेस्ट दांतांना लावावी.
चारकोल पावडरमध्ये मीठ घालावे. आणि हाताच्या बोटांनी दात घासावे.
एका वाटीत दोन चमचे मोहरीचं तेल आणि दोन चमचे मीठ घ्यावे. हे मिश्रण तेलात मीठ विरघळेपर्यंत मिसळा. तयार झालेली पेस्ट ब्रशवर घेवून दात ३-४ मिनिटे व्यवस्थित दातांना घासून घ्या. हा उपाय आडवड्यातून २-३ वेळा केल्यास लवकरच दांताचा पिवळापणा दूर होईल.
प्रत्येकाच्या दारातील तुळस खूपच फायदेशीर आहे. तुळशीच्या पानांचा वापर करून दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. कारण तुळशीमध्ये अनेक बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे दात स्वच्छ आणि चमकदार बनवण्यात मदत करतात. पहिल्यांदा तुळशीची पाने स्वच्छ धुवून उन्हात वाळवावी. सुकवल्यानंतर त्याची बारीक पावडर करावी. एक चमचा तुळसीच्या पांनाची पावडर आणि एक चमचा मोहरीचे तेल घेवून त्याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट दातांना लावून ३-४ मिनिटांनी दात स्वच्छ पाण्याने धुवावे. असे केल्याने दांताचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते.
संत्र्याच्या साल फेकून न देता ती स्वच्छ धुवून कडक उन्हात वाळवावी. नंतर त्याची मिक्सरच्या सहाय्याने पावडर करून घ्यावी. एक चमचा सत्र्यांच्या सालीची पावडर आणि एक चमचा तुळस पावडर घेवून दातांवर ब्रश करावे. आठवड्यातून २-३ वेळा असे केल्यास दातांवरील पिवळेपणा दूर होण्यात मदत होतेय सोबतच दातांवरील एक प्रकारची चमक येते.
एक चमचा ब्रेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्रित करून त्याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट टुथब्रशच्या मदतीने दातांना घासावी. यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.
७-८ लसणाच्या पाकळ्या घेवून ते बारीक किसणीने खिसून घ्यावे. यानंतर यात अर्धा चमचा खाण्याचा सोडा, अर्धा चमचा लिंबूचा रस आणि एक चमचा टोमॅटोचा रस घालून हे मिश्रण एकत्रित करावे. यानंतर घरातील टूथपेस्ट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. दररोज ही तयार झालेली पेस्ट दातांना लावून घासल्यास दातांचा पिवळेपणा कमी होतो. ( Teeth Whitening Tips )
हेही वाचा :