WhatsApp ने नोव्हेंबरमध्ये भारतात बॅन केले तब्बल ३७ लाख अकाउंट्स | पुढारी

WhatsApp ने नोव्हेंबरमध्ये भारतात बॅन केले तब्बल ३७ लाख अकाउंट्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेटा मालकीच्या  WhatsApp ने नोव्हेंबरमध्ये भारतात ३७.१६ लाख अकाउंट्सवर बंदी घातली आहे. जी मागील महिन्यात बंदी घालण्यात आलेल्या खात्यांपेक्षा जवळपास ६० टक्के जास्त आहे. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने नवीन आयटी नियम २०२१ चे पालन करून या अकाउंट्सवर बंदी घातली असल्याचे बुधवारी सांगितले.

व्हॉट्सअॅपने ऑक्टोबर महिन्यात देशातील २३.२४ लाख अकाउंट्सवर बंदी घातली होती. त्यापैकी ८.११ लाख अकाउंट्सवर सक्रियपणे बंदी घालण्यात आली होती. Whats App ने माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ अंतर्गत भारतासाठी प्रकाशित केलेल्या नोव्हेंबरच्या मासिक अहवालात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान, ३७,१६,००० WhatsApp खात्यांवर बंदी घालण्यात आली होती. यापैकी 9.9 लाख खाती वापरकर्त्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वी सक्रियपणे बॅन करण्यात आली होती. +91 फोन नंबरद्वारे भारतीय खाते ओळखले जाते. देशातील ४० कोटी युजर्स असलेल्या WhatsApp ला नोव्हेंबरमध्ये ९४६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८३० तक्रारींमध्ये खातेदारावर बंदी घालण्याच्या तक्रारींचा समावेश आहे. त्यापैकी केवळ ७३ खात्यांवर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button