आजचे राशिभविष्य (दि.१२ नोव्हेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.१२ नोव्हेंबर २०२२)

आजचे राशिभविष्य (दि.१२ नोव्हेंबर २०२२)

राशिभविष्य
मेष

मेष : प्रवास घडतील. प्रवासात सतर्क राहण्याची गरज. कामे झाल्याने मनावरील ताण नाहीसा होईल. आनंदित राहाल.
वृषभ
वृषभ

वृषभ : प्रेमात यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात दिवस मजेत घालवू शकाल. व्यवसाय व नोकरीतून चांगल्या वार्ता मिळतील.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : व्यवसाय, धंद्यातील नियोजन सफल झाल्यामुळे व्यवसायातील परिस्थिती सुधारेल. प्रगतिपथावर राहाल. जुनी येणी वसूल होतील.
राशिभविष्य
कर्क

कर्क : कौटुंबिक सौख्य लाभून कुटुंबातील मुला-मुलींकडून सुखद वार्ता मिळतील. नातेवाईकांच्या भेटी झाल्यामुळे आनंदी राहाल.
राशिभविष्य
सिंह

सिंह : शत्रू व हितशत्रूंच्या कारवायांवर विजय मिळवाल. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटीने आपल्या पुढील कामे आपण पूर्ण कराल.
राशिभविष्य
कन्या

कन्या : व्यवसाय, धंद्यात तसेच नोकरीत सहकार्‍यांचे सहकार्य लाभेल. नोकरीत सुखद बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये.
राशिभविष्य
तुळ

तूळ : मित्र-मैत्रिणींच्या वर्तुळात प्रिय राहाल. त्यांचे सहकार्यही मिळेल. सुसंवाद साधता येईल. मात्र, कुसंगती व व्यसने टाळा.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील आणि त्यामुळे महत्त्वाची कामे उरकून घ्याल. सरकारी कामात यश लाभू शकते. दीर्घ काळची प्रलंबित कामे पूर्ण होतील.
राशिभविष्य
धनु

धनु : नातेवाईक, आप्तेष्ट व मित्रमंडळी यांच्याबरोबर सुसंवाद साधता येईल. काही कार्यक्रम करण्याचे ठरेल. बरेच निर्णय धाडसाने घ्यावे लागतील.
राशिभविष्य
मकर

मकर : नोकरी व्यवसायानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास घडून शकतात. आर्थिक प्राप्ती होईल. जीवनसाथीची प्रत्येक कार्यात साथ लाभेल.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ : आपल्या स्वतःच्या मतावर ठाम राहाल. मात्र, परिस्थिती ओळखून निर्णय घ्या. त्यामुळे फायदा संभवतो. आर्थिक प्राप्तीत वाढ होईल.
राशिभविष्य
मीन

मीन : प्रेमात समज-गैरसमज झाल्यामुळे नात्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील पावले जपून टाका. आरोग्य चांगले राहील.

Back to top button