Yellow Tea: ‘यलो टी’चे हे आहेत आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या | पुढारी

Yellow Tea: 'यलो टी'चे हे आहेत आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

पुढारी ऑनलाईन : चहामध्ये आपण वेगवेगळे प्रकार ऐकलेत. देशीप्रकारांमध्ये प्रामुख्याने चहा, साधा चहा, स्पेशल चहा, गुळाचा चहा, मसाले चहा अशी चहाची नावे ऐकली आहेत एव्हाना त्यांची चव देखील चाखली असेल; पण ग्रीन टी, लेमन टी यासारखे परदेशी चहाच्या प्रकाराची नावे आपण अलिकडील काही दिवसांमध्ये ऐकत आहे. यामध्ये आणखी एका टीची भर पडली आहे, तो म्हणजे ‘यलो टी’. चीनमधून आलेला हा ‘यलो टी’ सर्वात महाग आणि विलायसी पेय म्हणूनही ओळखला जाताे. जगभरातील सेलिब्रेटी ‘यलो टी’ची निवड करतात, कारण या चहामध्ये (Yellow Tea) अनेक आरोग्यदायी फायदे आहे.

या चहाचे आरोग्यदायी फायदे सध्या जगभर पसरल्याने, यलो टीचे विविध प्रकार मार्केटमध्ये आले आहेत. या चहामध्ये नैसर्गिकरित्या पॉलीफेनॉल्स (Polyphenols) हा घटक मोठया प्रमाणात असतो. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे अनेक रोगांचा सामना करतात. यामधील पॉलीफेनॉल्स (Polyphenols हा घटक वय होणे, वातावरणातील बदल आणि बदलती जीवनशैली याच्या परिणामाने मानवी शरिरातील मृत झालेल्या पेशींना पुन्हा जिवंत करतो. तसेच हा यलो टी पचन, मेंदूचे कार्य आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करतो. रक्ताच्या गुठळ्या, हृदयविकार आणि विशिष्ट कर्करोगापासून संरक्षण करण्याचे कामही हा यलो टी करतो, यामुळे दिवसेंदिवस यलो टीचे (Yellow Tea) महत्त्व जगभरात वाढताना दिसत आहे.

Yellow Tea: यलो टीचे आरोग्यदायी फायदे

वजन कमी करण्यास मदत

तज्ज्ञांच्या मते, यलो चहाचा अर्क चयापचय क्रिया वाढवणे आणि चरबी लवकर वितळविण्यासाठी ओळखला जातो. हे यलो टी मध्ये असलेल्या पॉलिफेनॉल आणि कॅटेचिन या आरोग्यदायी घटकांमुळे होते.

यकृतासाठी फायदेशीर

यलो टी हा यकृतासाठी देखील फायदेशीर असतो. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, यलो टीमध्ये असलेला पॉलिफेनॉल हा घटक यकृताला सर्व प्रकारच्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करते. तसेच ‘हेपेटायटीस’च्या उपचारात देखील हा यलो टी मदत करतो.

मधुमेह नियंत्रणात राहण्‍यास मदत

ग्रीन टी हा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे, यलो टी हा टाइप-1 चा मधुमेह टाळण्यास मदत करतो.

वृद्धत्व विरोधी गुणधर्म

यलो टीमध्ये भरपूर पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात जे शरीराला सुरकुत्या, चेहऱ्यावरील डाग यांसारख्या वृद्धत्वाच्या सर्व लक्षणांशी लढण्यास मदत करते. तसेच निरोगी आणि तेजस्वी त्वचा देत, त्वचेचे आरोग्य निरोगी ठेवण्यास हा चहा मदत करतो.

भूक वाढते

जेवण घेण्यापूर्वी एक तास आधी हा यलो टी पिऊन वेगळा फिल घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून यलो टी घेतल्याने तुमची भूक ही नैसर्गिकरित्या वाढली जाईल.

प्रेग्नेंसी दरम्यान उत्तम

तज्ज्ञां‍च्या मते, प्रेग्नेंसी दरम्यान १२ व्या आठवड्यापर्यंत यलो टी घेणे फायद्याचे असते; पण प्रेग्नेंसीत यलो टी घेताना महिलांनी दररोज २०० ग्रॅमपेक्षा अधिक होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

Yellow Tea : खरेदी करताना ही घ्या काळजी

काही प्रकरणात असे आढळून आले आहे की, निकृष्ट दर्जेचा यलो टीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे महागडा यलाे टी घेताना त्याचा दर्जा आणि खरेदी करतो त्‍या ठिकाणची विश्वासहर्ता तपासणे गरजेचे असते.

हेही वाचा:

 

Back to top button