Black Tea :रोज सकाळी 'ब्लॅक टी' पिण्याचे हे आहेत फायदे? जाणून घ्या अधिक | पुढारी

Black Tea :रोज सकाळी 'ब्लॅक टी' पिण्याचे हे आहेत फायदे? जाणून घ्या अधिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमीच डॉक्टर चांगल्या आरोग्यासाठी ग्रीन टी पिण्याचा सल्ला देत असतात. यात खास करून त्यात व्हिॅटमीन, मिनरल, फायबर, कॅफिन, अन्टीऑक्सीडेंट आणि एमिनो अॅसिडचे घटक असतात. त्यामुळे अनेक आजारावर मात करता येते. तर ग्रीन टीसोबत ब्लॅक टी ( Black Tea) देखील चांगल्या आणि उत्तम आरोग्यासाठी चांगला आहे. यातील काही घटक मधुमेह, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, दमा, हाडे मजबूत करणे, रोग प्रतिकारशक्ती वाढवणे, हृदयासाठी फायदेशीर असून लट्ठपणासोबत अनेक आजारांवर ब्लॅक टी लाभदायक आहे. यासारख्या अनेक आजारांवर मात करण्यास ब्लॅक टी कसा फायदेशीर आहे आणि कोणत्या रोगावर मात करता येते याची थोडक्यात माहिती जाणून घेवुयात…

मधुमेह

ब्लॅक टीमध्ये फ्लोराईडचे प्रमाण जास्त असते. यामुळे टाईप २ प्रकारचा मधुमेहचा धोका कमी होण्यास मदत होते. ब्लॅक टीमध्ये दूध आणि साखरचा वापर केला जात नाही. यामुळे आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

तज्ज्ञांच्या मते, रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास जास्त आजारी पडण्याचा धोका असतो. ब्लॅक टीमध्ये अँटी-ऑक्सिडेंटचे घटक असल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. हा घटक मानवाच्या शरीरात व्हायरल होणाऱ्या इन्फेक्शन्सपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तर यातील कॅफिनदेखील चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे दररोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी ब्लॅक टीचे सेवन करावे.

हाडे मजबूत करते

दररोज सकाळी ब्लॅक टीचे सेवन केल्यास त्यातील फायटोकेमिकल्समुळे शरीरामधील हाडे मजबूत होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, ३० वर्षावरील व्यक्तीनी दररोज ब्लॅक टीचे सेवन केल्यास बोन डेन्सिटी, ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चरची जखम भरून येण्यास मदत होते.

कर्करोगाचा धोका कमी करते

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (NCI) च्या संशोधनातून ब्लॅक टीचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर यातील पॉलीफेनोल्स घटकांमुळे ट्यूमर वाढण्यासोबत त्वचा, स्तन, फुफ्फुस आणि प्रोस्टेटचा धोका कमी होतो.

दमा कमी करण्यास उपयुक्त

दमा असणाऱ्या रूग्णाला सुरूवातीच्या उपचारासाठी ब्लॅक टीचे सेवन करणे खूपच फायदेशीर होऊ शकतो. तर दररोज सकाळी दम्याच्या रूग्णांनी ब्लॅक टी घेतल्यास अटॅक रोखण्यास मदत होते. त्यामुळे या आजारांवर मात करण्यासाठी ब्लॅक टीचे सेवन नक्की करा.

हृदयासाठी फायदेशीर

ब्लॅक टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स (फ्लेव्होनॉइड्स) हृदयासाठी फायदेशीर असतात. ब्लॅक टीचे नियमित सेवन केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. तसेच उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. यासाठी रोज सकाळी उपाशी पोटी ब्लॅक टी प्यावी.

डोकेदुखी

साधे आपण जर डोके दुखत असेल तर दूधाचा चहा घेतो, परंतु, यावेळी त्याजागी ब्लॅक टी घेतल्याने डोकेदुखीवर आराम मिळतो. यासोबत डोकेदुखी कमी होते.

तणावमुक्त करते

जर एखादी व्यक्ती जर सतत तणावाखाली राहत असेल तर ब्लॅक टीच्या सेवनाने तमावमुक्त होतो. ब्लॅक टीमुळे तणाव वाढवणारे हार्मोन कोर्टिसोला कमी करण्यास मदत होते. तर ब्लॅक टीमधील आढळणारे अमिनो अॅसिड, एल थीनाईल हे तणावापासून मुक्ती देतात.

वजन कमी करते

ब्लॅक टीमधील अॅंटीऑक्सिडेंट वजन कमी करण्यास मदत करतात. तसेच ब्लॅक टीमुळे पोटावरील सुरकुत्या आणि चरबी कमी होण्यास मदत करते. ( Black Tea )

हेही वाचलंत का? 

Back to top button