Morning tea : सकाळी जाग येताच चहा घेताय? आरोग्यावर होऊ शकतील हे दुष्परिणाम

सकाळी जाग येताच चहा घेताय?
सकाळी जाग येताच चहा घेताय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सकाळी जाग आल्यानंतर दिवसाची सुरुवात आपल्यातील अनेक जण चहाने (Morning tea ) करतात. अनेकांना तर बेड टीचीही सवय आहे. कुटुंबासोबत, मित्रांत असताना आणि पाहुण्यासोबत चहा हे चांगले पेय आहे. ब्लॅक टीमध्ये अँटिऑक्सिडंटही असतात तसेच शरीराची चयापचय ही सुधारते. पण दिवसाची सुरुवात चहाने करणे ही चांगली आयडिया आहे का? तर नक्कीच नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतर पोटात काहीही नसताना चहा घेणे हे आरोग्यदायी नसते. चहाच काय अशा प्रकारे कॉफीही पिऊ नये असे न्युट्रिशन्समधील तज्ज्ञ सांगतात. (Morning tea )

पोटात काहीही नसताना जेव्हा सकाळी आपण चहा घेतो तेव्हा जठरावर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे जठरातील आम्ल वेगाने वाढते आणि पचनसंस्थेवर त्याचा दिवसभर परिणाम होतो.

त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम थोडे पाणी ,फळांचा ज्युस किंवा नारळाचे पाणी प्यावे.

  • सकाळी उठल्या उठल्या चहा का पिऊ नये याची खालील कारणे आहेत.

१) चयापचय प्रक्रिया बिघडते – सकाळचा असा चहा शरीरातील आम्ल आणि अल्कली यांचे संतुलन बिघडवते. त्यामुळे शरीराची चयापयच यंत्रणा बिघडून जाते.

२) शरीरातील पाणी कमी होते – चहा डाययुरेटिक असते म्हणजे ते शरीरातील पाणी काढून टाकते. सकाळी शरीरात पाणी आधीच कमी असते, त्यात आपण चहा घेतला तर शरीरातील पाणी आणि जोडीने मिनरल्सही कमी होतात.

३ ) तोंडाचे आरोग्य बिघडते – आपण बेड टी घेतला तर तोंडातील बॅक्टेरिया चहातील साखरचे विघटन करतात त्यामुळे तोंडातील आम्लही अनावश्यक वाढते. त्यामुळे दातांच्या वरील अवरण खराब होते.

४ ) मळमळणे – कॅफिनमुळे शरीराला तातडीने ऊर्जा मिळते. पण पोटात काही नसतान अशा प्रकारे मिळालेल्या ऊर्जेमुळे तुम्हाला दिवसभर मळमळ आणि अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे आधी काही तरी खाऊन मगच चहा किंवा कॉफी घ्यावी.

५ ) पोट गच्च होणे – चहात दूध असते. तर दुधात लॅक्टोज. उपाशी पोटी जर लॅक्टोज पोटात गेलेत तर गॅस होणे आणि पोट गच्च होणे असे त्रास जाणवू शकतात.

सकाळी काय प्यावे?

सकाळी उपाशी पोटी चहा किंवा कॉफी न पिता ताक, कोमट पाणी, लिंबू पाणी, नारळाचे पाणी, कोरफड ज्युस हे जास्त आरोग्यदायी असतात. सकाळी चहा घ्यायचा असेल तर तो ब्रेकफास्ट झाल्यानंतर काही वेळानंतर घेणे योग्य ठरते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news