आजचे राशिभविष्य (दि.१९ ऑगस्ट २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.१९ ऑगस्ट २०२२)

राशिभविष्य
मेष

मेष : अपेक्षित गाठीभेटी होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. कामे मार्गी लागतील. नवनवीन संधी मिळतील. आत्मविश्वास उत्तम असेल.
राशिभविष्य
वृषभ

वृषभः कामे चिकाटीने पूर्ण करा. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काम करताना दक्ष राहा. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. पैशाची आवक चांगली राहील.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : बुद्धीच्या जोरावर चांगले यश मिळेल. देवाणघेवाणीचे व्यवहार चांगले होतील. व्यापार व्यवसायातील लोकांना दिवस चांगला जाईल.
राशिभविष्य
कर्क

कर्क : नोकरीमध्ये मनाजोगी कामे होतील. जास्त कामे पडतील. मनोधैर्य चांगले असणार आहे. वरिष्ठांची मर्जी राखाल.
राशिभविष्य
सिंह

सिंह : कला क्षेत्रातील लोकांना सुसंधी आहे. नवीन निर्मितीचा आनंद घ्याल. मानसन्मान होण्याची शक्यता. सामाजिक क्षेत्रात कामाची संधी मिळेल.
राशिभविष्य
कन्या

कन्या : महत्त्वाच्या कामांमध्ये ज्येष्ठांचा सल्ला घ्या. आत्मविश्वासाने कामे करा. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
राशिभविष्य
तुळ

तूळ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. त्यांचे सहकार्य मिळेल. कामांमध्ये महत्त्वाचे बदल होतील. प्रवास घडेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल. अंदाज घेऊनच व्यवसाय वृद्धी करावी. नोकरीमध्ये चांगली संधी मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
राशिभविष्य
धनु

धनु : आर्थिक आवक चांगली असल्याने खर्चाचे प्रमाण वाढेल. आपली मते इतरांना पटल्याने आदरभाव मिळेल. प्राधान्यक्रम बदलतील. काही कामे लांबणीवर पडतील.
राशिभविष्य
मकर

मकर : मोठी गुंतवणूक लांबणीवर टाका. आर्थिक व्यवहारात योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यापार-व्यवसायात वाढ करताना तज्ज्ञांची मदत घ्या. प्रवास टाळा.
कुंभ -
कुंभ

कुंभ : मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. त्यांच्यासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल. आपल्या कार्यक्षेत्रात अपेक्षित लाभ होईल. नोकरी-व्यवसायात चांगला दिवस.
मीन
मीन

मीन : कलागुणांना वाव मिळेल. नवीन काम करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यावसायिकांना पत प्रतिष्ठेचा लाभ होईल. आर्थिकद़ृष्ट्या चांगला दिवस.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button