आजचं आपलं राशिभविष्य (दि.११ जुलै २०२२) | पुढारी

आजचं आपलं राशिभविष्य (दि.११ जुलै २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष- प्रामाणिकपणा व नीतीमत्ता महत्त्वाची आहे. नकारात्मक विचारांपासून लांब राहावे. समयसूचकता वापरावी. मनःस्ताप होण्याची शक्यता.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ-प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादाने प्रश्‍न मार्गी लागतील. व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन-आपले, जवळचे सहकार्य करतील. सज्जनांचा सहवास लाभेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. पदान्‍नतीचे योग. शत्रू पीडा कमी होईल.
राशिभविष्य
कर्क
कर्क-कामांच्या नियोजनाअभावी गती मंदावेल. मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका. गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. मनाविरुद्ध घटना घडतील.
सिंह
सिंह
सिंह-कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. जमीन-वास्तूसंबंधित कामांत अडचणी येतील. वाहने जपून चालवावीत.
राशिभविष्य
कन्या
कन्या- बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळवाल. प्रामाणिकपणा व साहस उपयोगी पडेल. आर्थिकद‍ृष्ट्या अनुकूल दिवस. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
तुळ
तूळ- अनावश्यक खर्च होतील. वस्तू हरवण्याची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहणे योग्य. संयम आवश्यक आहे. वरिष्ठांची मर्जी राखाल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक-सहलीचा आनंद घ्याल. मेजवानीचा लाभ होईल. अलंकार व वस्त्र खरेदी कराल. जुन्या मित्रमंडळींची भेट झाल्यामुळे आनंददायी दिवस असेल.
राशिभविष्य
धनु
धनु-वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच निर्णय घेणे योग्य ठरेल. शारीरिक श्रम होतील. कर्ज होण्याची शक्यता आहे. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
मकर
मकर-प्रयत्नांना यश मिळेल. मनासारख्या घटनांमुळे मनोबल वाढेल. आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल.
कुंभ -
कुंभ
कुंभ-सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. सामंजस्याने प्रश्‍न सुटतील. गृहसौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
मीन
मीन-आरोग्याच्या तक्रारी संभवतात. नियमांचे पालन करावे. सरकारी कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील. लेखकांसाठी अनुकूल दिवस.

Back to top button