आजचे राशिभविष्य ( दिनांक २७ मे २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य ( दिनांक २७ मे २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष-आशा -आकांक्षा पूर्ण होतील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. आत्मविश्वास वाढवणार्‍या घटना घडतील.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ-परावलंबी स्वभावामुळे कामांमध्ये अडचणी येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. कोणतेही आश्वासन, शब्द देऊ नका.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन-नवीन गोष्टी अंगीकाराल. नव्या दिशा व धोरणांमुळे कामांना गती मिळेल. विवाहविषयक सुवार्ता ऐकायला मिळेल.
राशिभविष्य
कर्क
कर्क-कौटुंबिक समस्या संवादाने सुटतील. मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. योग्य व्यवस्थापनामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील.
राशिभविष्य
सिंह
सिंह-भावनाप्रधान होण्याचे प्रसंग निर्माण होतील. व्यवहारात सावधानता बाळगा. खोट्या आमिषांना बळी पडू नका. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
कन्या
कन्या-दुसर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्या. निर्णय घेताना घाई नको. जुने आजार उद्भवतील. जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता.
राशिभविष्य
तुळ
तूळ-जोडीदाराबरोबर पर्यटनाचा आनंद घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. समज -गैरसमज दूर होतील. संतुलन साधल्यामुळे प्रश्न मार्गी लागतील.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक-चांगल्या स्वभावामुळे व चारित्र्यामुळे मान-सन्मान होतील. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल.
राशिभविष्य
धनु
धनु-अतिसाहस मनःस्ताप देणारे ठरू शकते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. शेअर, सट्टा व लॉटरीमध्ये नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
मकर
मकर-त्याच त्याच गोष्टी उगाळत बसल्यामुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. अनावश्यक खर्च टाळा.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ-प्रामाणिकपणा व सचोटीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. लोकांची देणी द्याल. भावंडांकडून सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
मीन
मीन-क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील.

Back to top button