या फोटोत एकूण किती प्राणी आहेत सांगू शकाल का ? | पुढारी

या फोटोत एकूण किती प्राणी आहेत सांगू शकाल का ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : वरील फोटोत अनेक प्राणी दिसत आहेत यापैकी तुम्ही किती प्राणी ओळखू शकाल? प्राण्याची संख्या मोजण्यासाठी तुम्हाला अचूक निरीक्षण करण्याची गरज आहे. या फोटोमध्ये एक हत्ती आणि इतर १२ प्राणी लपलेले आहेत. जर फोटोचे लक्ष देऊन निरीक्षण केले हे प्राणी ओळखणे फार कठीण नाही.

या फोटोतील सर्व प्राणी शोधून काढण्यासाठी हा फोटो तुम्हाला जवळून पाहावा लागेल. या हत्तीच्या फोटोमध्ये लपलेले गाढव, कुत्रा, मांजर आणि उंदीर हे प्राणी तुम्हाला लगेच दिसतील. जर तुम्ही फोटोमधील हत्तीला नीट पाहिले तर तुम्हाला हत्तींच्या शेपटीत लपलेला साप दिसेल. शेपटीमध्ये लपलेल्या सापाला छोटे डोळे आणि तोंड पाहता आहे. हत्तीच्या मागील पाय नीट पाहिल्यास त्यात तुम्हाला डास पाहायला मिळेल.

फोटोतील हत्तीच्या मध्यस्थानी चार ते सहा प्राणी दिसतात. हे प्राणी तुम्हाला स्पष्टपणे दिसतात. हत्तीच्या डोळ्यात तुम्हाला मासा पाहायला मिळेल. फोटोतील हत्तीच्या पाठीवर तुम्हाला हत्तीच्या कानाच्या आकाराचे कासव फिरताना दिसेल. हत्तीच्या सोंडेत तुम्हाला डॉल्फिन मासा दिेसेल व तोंडाच्या भागात मगर असल्याचे पाहायला मिळेल. तुमची खरी परीक्षा हत्तीच्या दोन्ही पायात लपून बसलेली कोळंबी शोधताना असेल. या फोटोमधील हत्तींमध्ये एकूण १३ प्राणी आहेत. यापैकी १० प्राणी जर तुम्ही शोधू शकला तर तुम्ही एक एफबीआय एजंट बनू शकता असे हा फोटो तयार करणाऱ्या संस्थेचा दावा आहे.

Back to top button