मागील आठवड्यात बाजारात राहिली अनपेक्षित तेजी, कारण काय?

मागील आठवड्यात बाजारात राहिली अनपेक्षित तेजी, कारण काय?

[author title="भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि." image="http://"][/author]

एनएसई आणि बीएसईची मुख्य कार्यालये मुंबईमध्ये आहेत. जिथून भारतीय शेअर मार्केटची ट्रेडिंग सिस्टीम कार्यान्वित होत असते; परंतु ही झाली नेहमीची सर्वसाधारण व्यवस्था. अपवादात्मक अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीत या यंत्रणेमध्ये काही व्यत्यय आला, तर त्याचा शेअर मार्केटच्या ट्रेडिंग मेकॅनिझमवर काही परिणाम होऊ नये म्हणून एनएसईने Disastery Recovry File ही यंत्रणा उभारली आहे. तिची कार्यक्षमता तपासण्यासाठी शनिवारी खास दोन तास मार्केट सुरू राहिले असे विशेष सत्र शनिवारी घेण्याची आजची या वर्षातील तिसरी वेळ.

निफ्टीने 22,500 ची पातळी पुन्हा ओलांडली. हा या आठवड्यासाठी शनिवारच्या विशेष सत्राचा गुंतवणूकदारांसाठी फायदा झाला. बँक निफ्टीही 48000 च्या वर बंद झाला, तर सेन्सेक्स 74000 च्या वर बंद झाला. निवडणुकीचा गदारोळ सुरू असताना आणि विजयाचे दावे-प्रतिदावे मांडले जात असताना पूर्ण आठवडा मार्केट तेजीत राहणे ही कमाल कशामुळे घडून आली, तर मागील सोमवारी म्हणजे सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी अमित शहांनी एनडीटीव्ही प्रॉफिट या चॅनेलवर येऊन चारशेच्या वर लोकसभा सीटस् मिळवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

अमित शहांच्या या आत्मविश्वासाने सर्वात जास्त बळ पुरविले ते सरकारी जहाज आणि रेल्वे कंपन्यांना. भारत डायनॅमिक्स, माझगाव डॉकयार्ड, बीईएमएल हे शेअर्स 30 टक्क्यांहून अधिक वाढले. हिंदुस्थान एरॉनॉटिक्स, कोचिन शिपयार्ड हे शेअर्स 20 टक्क्यांहून अधिक वाढले.

भारतीय शेअर बाजाराच्या द़ृष्टीने आणखी एक अत्यंत महत्त्वाची, सकारात्मक गोष्ट या आठवड्यात घडली. संयुक्त राष्ट्रसंघाने भारताच्या विकासदराच्या सुधारित अंदाजात वाढ करून तो 2024 मध्ये 6.9 टक्के, तर 2025 मध्ये 6.6 टक्के राहील, असे जाहीर केले. रिटेल इन्हवेस्टर्सना अशा गोष्टी विश्वास मिळवून देतात.

असे असले तरी विनाखंड परदेशी गुंतवणूक संस्थांची (FII) भारतीय बाजारातील विक्री हा चिंतेचा विषय आहे. 17 तारखेचा अपवाद वगळता FIIS नी विक्रीचा प्रचंड मारा सुरू केला आहे. मे महिन्यात आतापर्यंत हा विक्रीचा आकडा आहे. 3.5 Billion Dollers गुंतवणूक संस्था (DIIS) नी जवळपास इतक्याच रकमेची (रु. 34000 कोटी) खरेदी केली असली तरी FII च्या भारतीय बाजारातून काढता पाय घेण्यामागे कोणती कारणे असू शकतात?

टाटा मोटर्सने सन 2023-24 या आर्थिक वर्षात रु. 31,399 कोटी रु. निव्वळ नफा मिळविला आणि टाटा ग्रुपमध्ये ती टीसीएसला पहिल्या क्रमांकासाठी आव्हान देऊ लागली. अजूनही सन 2024 मध्ये रु. 45,908 कोटी इतका निव्वळ नफा मिळविणारी टीसीएस ही टाटा ग्रुपमध्ये प्रथम क्रमांकावर असली तरी विक्रीच्या बाबतीत टाटा मोटर्स मारुती, हुंडई यांच्या खालोखाल तिसरी मोठी कंपनी बनली आहे आणि टाटांच्या पंच, नेक्सॉन, टिअ‍ॅगो, अल्ट्रोझ या गाड्यांनी लोकप्रियता आणि वाढती मागणी पाहता लवकरच ती पहिल्या क्रमांकावर जाईल, असे वाटते.

त्या आठवड्यामध्ये दोन कपंन्यांनी बाजाराला प्रभावित केले. त्यापैकी एक आहे सोमानी सिरॅमिक्स. या आठवड्यात हा शेअर साडेबावीस टक्के वाढला. (सध्याचा भाव रु. 765.20) कंपनीने आपले चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. निर्यातीतील घट आणि देशांतर्गत मागणीतही घट या आव्हानांना पुरून कंपनीने मजबूत वाढ दर्शवली.

दुसरी कंपनी आहे हनीवेल ऑटोमेशन. हा शेअर देखील 16 तारखेला साडेपंधरा टक्के वाढून रु. 53484.55 हा वर्षभरातील उच्चांक त्याने नोंदविला. त्यालाही कारण होते कंपनीचे उत्कृष्ट आर्थिक निकाल.

हनीवेल ऑटोमेशनच्या शेअरची वर दिलेली किंमत पाहून तुम्ही अचंबित झाला असाल ना? 2023-24 या आर्थिक वर्षाचे सशक्त आर्थिक निकाल, 2025 साठी मोठ्या वर्क ऑर्डर्स आणि कंपनीचे Demerger करून एनर्जी डिव्हीजनची स्वतंत्र कंपनी या तीन बाबीमुळे सिमेन्स या अत्यंत प्रतिष्ठेच्या पॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि ओबिलिटी कंपनीने सप्ताह गाजवला. Siemens Enery India Ltd ही नवीन कंपनी लवकरच बाजारात नोंदणीकृत होईल. आठवड्यात शेअर 15 टक्के वाढून 7204 वर बंद झाला. मागील सहा महिन्यांत हा शेअर 100 टक्के वाढला आहे. जेफरीजने सिमेन्सची टारगेट प्राईस 8000, आयआयएफएलने 7554, नुवामाने 7700, मोतीलाल ओसवालने 7800 दिली आहे. या निमित्ताने भारतातील Highest priced पाच प्रमुख कंपन्या आणि त्यांचे सध्याचे भाव वरील चौकटीत पहा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news