बेळगाव : धामणे परिसरात हत्तींचा धुमाकूळ
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा: एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना आता धामणे परिसरात हत्तींचा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरवर्षी तिलारी परिसरातून धामणे व चंदगड तालुक्यातील काही गावात हत्तींचा उपद्रव होत असतो. गेल्या चार दिवसांपासून धामणे परिसरात तीन हत्तींचा वावर असून भात पिकांसह उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे.
याच दरम्यान हत्तींना माघारी धाडण्यासाठी ग्रामस्थांकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत; पण त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे वनविभागाने हत्तींना या परिसरातून हुसकावून लावावे, शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. धामणे परिसरात हत्तींचा धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचलंत का?
- बारामती : टॅटूवरून पोलिसांनी लावला बलात्काऱ्याचा शोध
- परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करा : विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा
- दिंडीतील वारकर्यांच्या अपघातामुळे मावळातील सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर !
नंदुरबार : तहसीलदारांनी वीजवितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे https://t.co/05Y7waxK2f #pudharionline #pudharinews
— Pudhari (@pudharionline) November 29, 2021