Karnataka Election : १६० मतांनी हार, ते १६ मतांनी विजय! जयनगर मतदारसंघाच्या मोजणीचा रात्रभर गोंधळ | पुढारी

Karnataka Election : १६० मतांनी हार, ते १६ मतांनी विजय! जयनगर मतदारसंघाच्या मोजणीचा रात्रभर गोंधळ

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : जयनगर मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत मतमोजणीवरून शनिवारी रात्रभर गोंधळ पहायला मिळाला. या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी यांचा 160 मतांनी विजय झाल्याचे सुरुवातीला जाहीर करण्यात आले होते. फेर मतमोजणी केल्यानंतर भाजप उमेदवार राममूर्ती यांचा 16 मतांनी विजय झाला.

भाजपचे तेजस्वी सूर्या आणि भाजप उमेदवार राममूर्ती यांनी फेरमतमोजणीचा आग्रह धरला. त्याला काँग्रेसच्या सौम्या रेड्डी यांनी विरोध केला. त्यादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार मतदारसंघात पोहोचले. त्यांनीही तेथे धरणे आंदोलनाला सुरुवात केली. मात्र आयोगाने फेरमतमोजणी करण्याचा निर्णय घेतला. फेर मतमोजणी केल्यानंतर भाजप उमेदवार राममूर्ती यांचा 16 मतांनी विजय झाला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आधी पराभव आणि नंतर विजय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांना हर्षोल्हासाचे भरते आले होते. काँग्रेसच्या रेड्डी यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर काँग्रेसच्या रामलिंग रेड्डी यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांवर गंभीर आरोप केले आहेत.

Back to top button