मडगाव : कर्नाटकातील श्री गौळादेवीच्या जत्रेसाठी गेलेले गोव्याचे हजोरो भाविक जंगलात अडकले | पुढारी

मडगाव : कर्नाटकातील श्री गौळादेवीच्या जत्रेसाठी गेलेले गोव्याचे हजोरो भाविक जंगलात अडकले

मडगाव पुढारी वृत्तसेवा कर्नाटकाच्या जाेयडा तालुक्यातील प्रसिध्द दैवत श्री गौळादेवीच्या जत्रेला सहभागी होण्यासाठी गोव्यातून गेलेले हजारो भाविक काली राखीव वनक्षेत्रात रात्रभर अडकून पडले आहेत. लहान मुलांसह अबाल वृद्ध असे हजारो लोक गोव्यातून या जत्रोत्सवासाठी गेले होते.अरुंद कच्चा रस्ता आणि त्यात अनेकांच्या गाड्या वाटेत अडकून पडल्या होत्या. ना जेवण ना पाणी अश्या परिस्थितीत वाहतूक नियंत्रणाच्या अभावी हजारो लोक उपाशीपोटी तब्बल बारा तासांहुन जास्त काळ दाट जंगलात अडकले आहेत.

गोवा आणि कर्नाटकाच्या राखीव वनक्षेत्राच्या घनदाट जंगलातून या मंदिरात जाण्यासाठी वाट आहे.दर वर्षी गोवा,महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक या जत्रेसाठी कर्नाटकाच्या म्हायरे येथे गौळादेवीच्या दर्शनासाठी जातात.जंगलाच्या मध्यभागी हे मंदिर आहे.वारूळ रुपी देवीला साडी नेसवण्याचा मुख्य कार्यक्रम रविवारी पाच मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता.त्यासाठी उगे मार्गे धारगिणी येथून राखीव वनक्षेत्राच्या हद्दीतून भाविक सकाळीं पाच वाजल्यापासून भाविक दाखल होऊ लागले होते.यात दुचाक्या चारचाक्यांपासून लोकांनी टिप्पर ट्रक सुद्धा आणले होते.अगदी तान्हुल्या मुलांसह वयोवृद्ध सुद्धा यात्रेत सहभागी झाले होते.

हा संपूर्ण रस्ता राखीव वनक्षेत्रातून जात असल्याने त्यावर डांबरीकरण आणि रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही.अश्या परिस्थिती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही राज्यांतून पोलीस नियुक्त करण्यात न आल्याने सकाळी दहा वाजता जंगलातच वाहतूक अडकुन पडली.राखीव वन क्षेत्रात मोबाईलला नेटवर्क नसल्याने लोकांचे भरपूर हाल झाले. पहाटे घरातून बाहेर पाडलेले हजारो लोक उपाशीपोटी जंगलात अडकून पडले होते.रात्री दहा वाजेपर्यंत हजारो गाड्या च्या रांगा जंगलात अडकल्या होत्या. भूक आणि तहानेने सर्वाची अवस्था बिकट झाली होती.काही वहाने वाटेत नादुरुस्त होऊन पडल्या होत्या. रात्री उशीरा पर्यत दोन्ही राज्यातुन कोणत्याही स्वरूपाचे मदतकार्य भाविकांना मिळाले नव्हते. लहान मुलांचे उपाशीपोटी बरेच हाल झाले.

गौळादेवी मंदिरात जाण्यासाठी कर्नाटकातून मार्ग आहे पण जंगलातील हा रस्ता शॉर्टकट असल्याने गोव्यातील भाविक याच रस्त्याचा वापर करतात.वार्षिकोत्सवाच्या वेळी केवळ दोनच दिवसांसाठी सामन्य जनतेकरीता राखीव वनक्षेत्रातील हा मार्ग खोलण्यात येतो.

रविवारी दुपारी बारा वाजता जंगलाट अडकून पडलेली वहाने सोमवारी पहाटे पाच वाजता जंगलातून बाहेर पडली. माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, केपेचे नगससेवक दयेश नाईक,सावर्डेचे माजी सरपंच संदीप पाउसकर आदी नेत्यांनी स्वता पुढाकार घेऊन वाहनांना मार्ग मोकळा करुन दिला.

राखीव वनक्षेत्रात हजारो गाड्या रात्रभर अडकून पडल्या होत्या.लोकांकडे जेवण आणि पिण्यासाठी पानीही नव्हते.मदत मागण्यासाठी नेटवर्क सुद्धा नव्हता.डोंगराळ भागात कोणतीही सुविधा लोकांना मिळाली नव्हती.या भागात गवे आणि अस्वल सारख्या हिंस्त्र रानटी श्वापदांची भीती असल्याने लोकांना तासंतास गाडीत बसून राहावे लागले.देवाचा नैवेद्य आणि वाटणे खाऊन लोकांनी आपली भूक शमवली होती.

हेही वाचा : 

Back to top button