राजू शेट्टी यांना महायुतीत आणण्याचे प्रयत्न : चंद्रकांत पाटील | पुढारी

राजू शेट्टी यांना महायुतीत आणण्याचे प्रयत्न : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महायुतीत ‘रासम’ पूर्वीपासूनच घटक पक्ष आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना मधल्या काळात बाजुला गेली. मात्र राजू शेट्टी यांना महायुतीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते प्रतिसादही देतील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

मंत्री पाटील म्हणाले, खा. संजय राऊत हे शिव्याशाप देत फिरत आहेत. पण मला फरक पडत नाही. राऊत ज्या आमदारांच्या जीवावर खासदार झाले ते त्यांना सोडून गेले आहेत. हिम्मत असेल तर राऊत यांनी खासदारकीचा राजिनामा देऊन पुन्हा विजयी होऊन दाखवावे. विरोधक नैराश्येतून ते काहीही बोलत आहेत. कसब्यात विजय झाल्याने इव्हीएम चांगले वाटते. पराभव झाला असता तर इव्हीएमला दोष दिला असता. देशात काँग्रेसचे आमदार 16 टक्क्यांनी घटले आहेत. तर लोकसभेत त्यांना विरोधी पक्षनेता निवडता येत नाही. कारण त्यांना 57.2 लोकप्रतिनिधी हवेत. त्यांच्याकडे केवळ 44 आहेत.

खा. महाडिक यांच्या मंत्रिपदासाठी पक्षाकडे भूमिका मांडू

खा. धनंजय महाडिक यांना केंद्रात पश्चिम महाराष्ट्रातून मंत्रीपद मिळेल का? यावर ते म्हणाले, सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे नाहीत. मात्र ज्यावेळी अशी वेळ येईल त्यावेळी पक्षात निर्णय घेणार्‍यांकडे याबाबत विषय मांडला जाईल.

Back to top button