पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढणार : लक्ष्मण सवदी | पुढारी

पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढणार : लक्ष्मण सवदी

संबरगी : पुढारी वृत्तसेवा :  अथणी विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांनी केले. ते पत्रकाराशी बोलत होते.

राज्यात भाजप पक्ष संघटना भक्कम होत असून काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र, काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते भाजपचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगत आहेत. परंतु, भाजपचा एकही आमदार त्यांच्या संपर्कात नाही.

विनाकारण दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राज्यात व केंद्रात भाजप सरकार आल्यापासून विकास होत असून आगामी निवडणुकीमध्ये भाजप सत्तेवर येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Back to top button