बेळगाव : खरेदीला उधाण, आज लक्ष्मीपूजन | पुढारी

बेळगाव : खरेदीला उधाण, आज लक्ष्मीपूजन

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  दिवाळीपर्वाला उत्साहात प्रारंभ झाला असून सोमवारी होणार्‍या लक्ष्मीपूजनाची पार्श्वभूमीवर रविवारी बाजारपेठेत खरेदीला उधाण आले होते. बाजारपेठेत तोब गर्दी झाल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजारमध्ये ग्राहकांची गर्दी झाली होती

दोन वर्षानंतर यंदाच्या दिवाळी खरेदीमुळे बाजारात मोठी तेजी आहे. आकाश कंदील, पणत्या, सुगंधी उटणे, साबण तेल, तयार फराळ अशा सर्वच दुकानात गर्दी होती. लक्ष्मी पूजनासाठी आवश्यक फुले खरेदीसाठी फुलांच्या दुकानात सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी होती. शहरात रविवारी दिवसभर सर्वच आस्थापने, दुकानांत साफसफाईसह रंगरंगोटी सुरु होती.

रविवारी शहराबरोबर तालुक्यातून तसेच शेजारी चंदगड तालुक्यातूनही नागरिक खरेदीसाठी दाखल झाले होते. वाहनांमुळे शहरातील पार्किंग चार वाजताच फुल्ल झाले होते. धर्मवीर संभाजी चौक, युनियन जिमखाना रोडवर तसेच कॅम्प येथील महिला पोलिस स्थानकाजवळ चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाचीही तारांबळ उडाली होती.

Back to top button