निपाणी : यमगर्णीत भरदिवसा घरफोडी; तीन तोळे दागिन्यांसह रोकड लंपास | पुढारी

निपाणी : यमगर्णीत भरदिवसा घरफोडी; तीन तोळे दागिन्यांसह रोकड लंपास

निपाणी;  पुढारी वृत्तसेवा :  यमगर्णी येथे सोमवारी भरदिवसा माळभागावरील लक्ष्मी मंदिरनजीक घरफोडी करून चोरट्यांनी 50 हजार रुपये व तीन तोळे सोन्याचे दागिने असा 2 लाखांचा ऐवज लंपास केला.

संजय पाटील यांच्या घरी ही चोरीची घटना घडली. संजय पाटील यांची पत्नी व मुलगी जनावरे चारण्यासाठी घराला कडी लावून गेल्या होत्या. याचा फायदा घेऊन चोरट्याने घरात प्रवेश करून तिजोरीतील रोख रक्कम व सोन्याचा नेकलेस, कानातील रिंग, कर्णफुले, कर्ण ाखळी, लॉकेट, मंगळसूत्रातील मनी असे एकूण तीन तोळे सोने लंपास केले.

चोरटा हा एकटाच होता. त्याने गुलाबी रंगाचा टी-शर्ट परिधान केला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन तपास चालवला आहे. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलिस स्थानकात झाली आहे.

Back to top button