बेळगाव : विनय कुलकर्णींसह १८ जणांना जामीन | पुढारी

बेळगाव : विनय कुलकर्णींसह १८ जणांना जामीन

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : कारागृहातून सुटल्यानंतर बेकायदा मिरवणूक काढून कोरोना मार्गसूचीचा भंग केल्याप्रकरणी माजी मंत्री विनय कुलकर्णीसह 18 जणाना बेळगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 21 ऑगस्ट 2021 रोजी विनय कुलकर्णी यांची कारागृहातून जामिनावर मुक्‍तता करण्यात आली होती. येथील हिंडलगा कारागृहातून सुटल्यानंतर कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांनी परवानगी न घेता मिरवणूक काढली होती.

याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तीनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी 18 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button