बोगस सौंदर्यप्रसाधने बनविणार्‍यांना अटक; औताडेवाडीतून 28 लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

बोगस सौंदर्यप्रसाधने बनविणार्‍यांना अटक; औताडेवाडीतून 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा: हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्यप्रसाधने तयार करणार्‍या सहा जणांकडून पोलिसांनी 28 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना औताडेवाडी (ता. हवेली) हद्दीत मंगळवारी रात्री घडली. सध्या औताडेवाडी येथे राहणार्‍या नारायण लालजी मेरा (वय 45, रा. देवदयानगर सोसायटी, ठाणे वेस्ट, मुंबई), लिनेश हिराचंद गाला (वय 47, रा. नाहुर व्हिलेज, मुलुंड वेस्ट, मुंबई), प्रवित्र जगबंधू पात्रा (वय 31, रा. नयखंडी, तहसील खैरा, जिल्हा बालेश्वर, ओडिशा), निशिकांत खेत्रमोहन पात्रा (वय 25, रा. नयखंडी, तहसील खैरा, जिल्हा बालेश्वर, ओडिशा), मानस बाबुली पात्रा (वय 19, रा. नयखडी, तहसील खैरा, जिल्हा बालेश्वर, ओडिशा), गीतम निरंजन मिडघा (वय 29, रा. मधमग्राम, तहसील मतस्वर, जिल्हा बडघमवाडी, पश्चिम बंगाल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी दीपक बाबूलाल पटेल (वय 43, रा. प्लस सोसायटी, जयनगर, मार्वे रोड, मालाड वेस्ट, मुंबई) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्तान कंपनीमार्फत वितरित होणारी साधने यासंदर्भात संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दीपक पटेल यांना कंपनीने दिले.

मंगळवारी लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार राजेंद्र दराडे यांना एका खबर्‍याकडून माहिती मिळाली की, औताडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत गोडाऊनमध्ये काही इसम हे वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या सौंदर्यप्रसाधनांची नक्कल करून बनावट माल तयार करीत आहेत. त्यानुसार वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांनी कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार सदर माहितीची खात्री करण्यासाठी नऊ वाजण्याच्या सुमारास या गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी सदर सहा इसम हे गोडाऊनमध्ये मिळून आले.

Back to top button