बेळगाव : हनुमाननगर परिसरातील प्राध्यापकाचे घर फोडले | पुढारी

बेळगाव : हनुमाननगर परिसरातील प्राध्यापकाचे घर फोडले

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : हनुमाननगर परिसरातील चिक्कू बाग येथील तीन दिवसांपासून बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले. कपाटातील 1 तोळ्याची सोनसाखळी, 305 ग्रॅम चांदी व 4 मनगटी घड्याळे असा 72 हजार 200 रुपयांचा ऐवज लांबवला.

प्रा. के. पी. तेजस्वी यांच्या मालकीचे हे घर आहे. ते जीआयटी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते पत्नीसमवेत धर्मस्थळला गेले होते. मंगळवारी सकाळी जेव्हा ते बेळगावात घरी पोहोचले तेव्हा समोरील दरवाजाचे इंटरलॉक तोडलेले दिसले.

त्यांनी आत जाऊन पाहिले असता, वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये जाऊन चोरट्यांनी तेथील कपाटाच्या चाव्या घेतल्या. त्याद्वारे त्यांनी कपाटातील एक तोळ्याचे दागिने, चांदी व चार किमती मनगटी घड्याळे लांबवल्याचे आढळून आले.

ही माहिती त्यांनी एपीएमसी पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न झाला. पोलिस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button