Gangubai Kathiawadi :’जब सैयां’मध्ये रोमँटिक अंदाजात आलिया | पुढारी

Gangubai Kathiawadi :'जब सैयां'मध्ये रोमँटिक अंदाजात आलिया

पुढारी ऑनलाईन डेस्क

आलिया भट्टचा चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) रिलीज होण्यास सज्ज आहे. आलिया य़ा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी या चित्रपटाच्या माध्यमातून गंगुबाईची दुनिया दाखवणार आहेत. आता या चित्रपटातील ‘जब सैयां’ हे गाणे रिलीज झाले आहे. गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाच्या गाण्यात अभिनेता शांतनू माहेश्वरीसोबत ती रोमान्स करताना दिसतेय. (Gangubai Kathiawadi)

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत होतं की, कशाप्रकारे गंगुबाई राजकारण आणि क्राईमच्या जगावर राज करते. परंतु, आता रिलीज रिलीज झालेल्या गाण्यात तिचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो. आलिया या गाण्यात खूप सुंदर दिसते.

आलियाचे नवे गाणे ‘जब सैयां’ सारेगामाच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आलं आहे. हे पूर्ण गाणं गंगूबाईच्या रोमँटिक अंदाजात दाखवलं गेलंय. या गाण्यात आलिया शांतनु माहेश्वरीसोबत आहे. शांतनू एक नवा अभिनेता आहे. पण. या गाण्यात तो आलियासोबत परफेक्ट दिसत आहे. दोघांमध्ये अनेक सुंदर रोमँटिक दृश्य चित्रीत करण्यात आले आहेत. या गाण्यासोबत प्रेक्षकांना गंगुबाई दबंग अंदाजासोबतच रोमँटिक अंदाजात दिसत आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर आधीपासूनचं चर्चेत आहे. ट्रेलरमध्ये आलियाचा दमदार अभिनय पाहून या चित्रपटासाठी एक्सायटेड करण्यात आलं आहे.

अजय देवगनदेखील मुख्य भूमिकेत

’एक क्राईम ड्रामा चित्रपट आहे. मुंबईतील कोठेवाली (रेड लाईट) ची कहाणी आहे. तेथील क्राईमशी तिचं सखोल संबंध आहे. आलिया मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय अजय देवगन, विजय राज आणि शांतनू माहेश्वरीदेखील दिसणार आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करणार आहेत. हा चित्रपट आता २५ पेब्रुवारी २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Back to top button