Tata Motors : टाटा मोटर्सच्या ‘या’ गाड्या महागणार; कंपनीने केली घोषणा | पुढारी

Tata Motors : टाटा मोटर्सच्या 'या' गाड्या महागणार; कंपनीने केली घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शनिवारी (५ नोव्हें) टाटा मोटर्स या ऑटोमोबाईल कंपनीने तिच्या गाड्यांची किंमत वाढविणार असल्याची घोषणा केली. कंपनीच्या सर्व पॅसेंजर प्रकारातील गाड्यांच्या किंमती वाढणार अशी प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे टाटाच्या कार चाहत्यांसाठी आता ही मोठी बातमी असणार आहे. (Tata Motors)

सोमवारी (७ नोव्हेंबर) कंपनीच्या पॅसेंजर प्रकारातील गाड्यांच्या मॉडेलनुसार त्यांच्या किंमतीमध्ये ०.९% ची वाढ होईल, अशी माहिती एका माध्यमाने दिली आहे. मात्र या गाड्यांच्या किंमतीमध्ये किती वाढ केली जाईल याबाबतची स्पष्टता सोमवारी कंपनीकडून केली जाईल. कंपनीने याबाबत माहिती देत असताना सांगितले, की वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कंपनीने यापूर्वी ऑक्टोबरमध्ये १५७ टक्क्यांनी ईलेक्ट्रीक गाड्यांच्या विक्रीमध्ये वाढ झाली असल्याची देखील माहिती दिली आहे. (Tata Motors)

कंपनीच्या पॅसेंजर गाड्यांपैकी Tiago, Punch, Harrier आणि Safari या कार मॉडेल लोकप्रिय आहेत. या कार मॉडेलची सध्या भारतात मोठी प्रसिद्धी आहे.

हेही वाचा

Back to top button