Gujarat Assembly Election 2022 : गुजरात सोडा, सत्येंद्र जैन यांना सोडतो; भाजपने ऑफर दिल्याचा केजरीवाल यांचा दावा | पुढारी

Gujarat Assembly Election 2022 : गुजरात सोडा, सत्येंद्र जैन यांना सोडतो; भाजपने ऑफर दिल्याचा केजरीवाल यांचा दावा

अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन : गुजरात निवडणुकीतून तुम्ही बाहेर पडा, आम्ही मंत्री सत्येंद्र जैन (satyendra jain) यांना सोडून देतो, अशी ऑफर भाजपने (BJP) आपला (AAP) दिल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला. एका कार्यक्रमादरम्यान केजरीवाल यांनी हा खुलासा केला. यासह त्यांनी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांना देखील आप सोडून भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती व यासाठी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री पद देतो असे म्हणाले होते असे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. (Gujarat Assembly Election 2022)

दिल्ली पाठोपाठ पंजाबवर सत्ता मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली आपने आता गुजरात निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. सातत्याने अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये कॅम्पेनिंग करत आहेत. त्यांनी गुजराती जनतेसाठी खास गुजराती भाषेत आपला विधानसभा निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले. अशा प्रकारे गुजरात विधान सभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर केजरीवाला यांचा आप वेगवेगळे युक्तींचा वापर करत मतदारांना आकर्षित करु पहात आहे. (Gujarat Assembly Election 2022)

याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपवर निशाना साधत गुजरात निवडणुकीतून बाहेर पडण्यासाठी मंत्री सत्येंद्र जैन यांना सोडण्याची ऑफर भाजपने आपल्याला दिल्याचा खुलासा यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केला. यावेळी फसवणूक प्रकरणात अटकेत असणार सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याने अरविंद केजरीवाल यांना महाठग म्हणत त्यांनी ५०० कोटी आणण्यास सांगितले होते, असा आरोप केला आहे. या आरोपाबाबत केजरीवाल यांना विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, पुर्वी बाजारात मनोहर गोष्टींचे पुस्तक येत असे, अशाच प्रकारे हा आरोप म्हणजे भाजपच्या मनोहर गोष्टी आहेत. जनता अशा मनोहर गोष्टींना भूलणार नाही असे केजरीवाल म्हणाले. (Gujarat Assembly Election 2022)

सुकेश चंद्रशेखर याच्या आरोपाचे खंडण करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, मुरबी अपघातातून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी भाजपने सुकेश चंद्रशेखरच्या आधारे रचेलेली ही मनोहर गोष्ट आहे. गुजरातच्या जनतेला विकास हवा आहे आणि त्यांना माहित आहे की, विकास हा अरविंद केजरीवाल आणि आपच देऊ शकतो. (Gujarat Assembly Election 2022)

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले, भाजपने येथे काम केले असते तर 27 वर्षांनंतर गुजरातमध्ये आम्हाला स्थान मिळाले नसते. गुजरातचे लोक केजरीवाल यांना आपला भाऊ मानू लागले आहेत, त्यांना आपल्या कुटुंबाचा भाग मानू लागले आहेत, असेही ते म्हणाले. मी गुजरातच्या जनतेला वचन दिले आहे की, आमचे सरकार स्थापन झाले तर तुमच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून मी जबाबदारी घेईन.


अधिक वाचा :

Back to top button