KGF Chapter 2 एप्रिलच्या ‘याच’ तारखेला होणार रिलीज!, सुपरस्टार ‘यश’ने दिले चाहत्यांना वचन | पुढारी

KGF Chapter 2 एप्रिलच्या ‘याच’ तारखेला होणार रिलीज!, सुपरस्टार ‘यश’ने दिले चाहत्यांना वचन

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचा सुपरस्टार ‘यश’ ‘KGF’ चित्रपटाद्वारे संपूर्ण जगाच्या हृदयावर राज्य करतो. ‘केजीएफ’च्या सुपरहिटनंतर या अभिनेत्याची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. ज्याचे दृश्य यशच्या वाढदिवसाच्या दिवशी चांगलेच पाहायला मिळत आहे. जगभरातून अभिनेत्याचे चाहते त्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत. यासोबतच फिल्मी दुनियेतील स्टार्सनीही अभिनेत्याला त्याच्या खास दिवशी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, ‘KGF Chapter 2’ च्या निर्मात्यांनी या बदल्यात चाहत्यांना मोठी भेट दिली आहे.

सुपरस्टार यश आज ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. यशने वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. मोस्ट अवेटेड चित्रपट KGF Chapter 2 चे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत यशने पोस्टर शेअर करून वचन दिले आहे की हा चित्रपट एप्रिल 2022 मध्येच प्रदर्शित होईल.

यशकडून चाहत्यांना ‘गिफ्ट’

गेल्या वर्षी, सुपरस्टार यशच्या वाढदिवशी, ‘KGF Chapter 2’ च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. चाहत्यांच्या विनंतीनंतर हा टीझर रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये यशची खतरनाक स्टाइल पाहायला मिळाली. यासोबतच संजय दत्तच्या अधिरा या व्यक्तिरेखेची झलकही चाहत्यांना दिसली.

KGF एप्रिलमध्येच येईल…

यशच्या ‘KGF Chapter 2’ चे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये यश साकारत असलेला ‘रॉकी भाई’ त्यांच्या स्टाईलमध्ये उभा असलेला दिसत आहे. तो काहीतरी विचार करत आहे असे एकूणच त्याच्या बॉडी लँग्वेजवरून दिसते. यशच्या शेजारी एक धोक्याचे चिन्ह आहे ज्यावर लिहिले आहे, ‘सावध राहा, पुढे धोका आहे.’ पोस्टरमध्ये चित्रपटाची रिलीज डेट 14 एप्रिल 2022 देण्यात आली आहे. याचाच अर्थ निर्मात्यांनी हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे.

‘KGF Chapter 2’ हा 2018 मध्ये आलेल्या KGF चित्रपटाचा सिक्वेल आहे. मागच्या चित्रपटात यशच्या रॉकी भाई या पात्राची थेट ‘गरुडा’शी लढत होती. आता नव्या चित्रपटात तो ‘अधीरा’शी स्पर्धा करणार आहे, जो खूपच धोकादायक आहे. संजय दत्त अधीराची भूमिका साकारत आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज आणि इतर कलाकार आहेत. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी हा चित्रपट बनवला आहे.

Back to top button