Rohit Sharma Wife : रोहित शर्माला मिठीत घ्यायचंय, पत्नी रितिकाची भावनिक ‘कमेंट’! | पुढारी

Rohit Sharma Wife : रोहित शर्माला मिठीत घ्यायचंय, पत्नी रितिकाची भावनिक ‘कमेंट’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा हिटमॅन म्हणजेच रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह (Rohit Sharma Wife) ही सर्वाधिक पसंतीची जोडी आहे. या जोडप्याच्या फोटोंना सोशल मीडियावर लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. सध्या रितिकाची एक कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कमेंटमधून तिचे रोहितवर किती प्रेम आहे हे दिसून येते. तिची ही कमेंट नेटक-यांच्या पसंतीस पडत आहे.

रितिकाला मैदानावर रोहित शर्माला चीअर करताना आपण अनेकदा पाहिलं आहे. जेव्हा हिटमॅन फलंदाजीला येतो तेव्हा रितिका त्याच्या चांगल्या फलंदाजीसाठी प्रार्थना करत असते. तर हिटमॅन रोहितची शतक झळकावल्यानंतर मैदानातून पत्नीवर प्रेम व्यक्त करण्याची स्टाईल सर्वांनाच आवडते. सध्या रितिकाने एका खास छायाचित्रावर कमेंट करून सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. (Rohit Sharma Wife)

Rohit Sharma Wife : रोहित शर्माला मिठीत घ्यायचंय, पत्नी रितिकाची भावनिक कमेंट!
Rohit Sharma Wife : रोहित शर्माला मिठीत घ्यायचंय, पत्नी रितिकाची भावनिक कमेंट!

झालं असं की, मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर रोहित शर्मासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, त्याला “Hey- b-ro” असे कॅप्शन दिले आहे. मात्र, सूर्यकुमार यादवच्या या पोस्टवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने कमेंट केली आहे. ही कमेंट वाचून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. रितिकाने लिहिलंय की, ‘रोहितला माझ्याकडून मिठी मार’.

तिच्या या कमेंटला सूर्यानेही उत्तर दिलंय आणि लिहिलंय की, ‘होय, मिठी मारली’. एकप्रकारे रितिकाला रोहितचा विरह सहन होत नसल्याचे तिच्या कमेंटमधून दिसत असल्याचे सोशल मीडियावर चर्चा आहे. (Rohit Sharma Wife)

 

रोहित शर्मा मागील काही काळापासून बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. तो त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरा होत आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍यापूर्वी (IND vs SA) तो जखमी झाला होता. अशा परिस्थितीत जेव्हा सूर्यकुमार यादव बंगळुरूमध्ये त्याला भेटला तेव्हा त्याने रोहितसोबतचा फोटो पोस्ट केला. रोहित सध्या दुखापतीशी झुंज देत आहे, त्यामुळे कसोटीनंतर आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही तो बाहेर पडला. पण हिटमॅन पूर्णपणे त्याच्या फिटनेसवर काम करत असून तो सध्या टीम इंडियाच्या काही खेळाडूंसोबत एनसीएमध्ये आहे. रोहितला नुकतेच टी-20 नंतर एकदिवसीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे, तसेच मुंबई संघानेही त्याला आयपीएलसाठी कायम ठेवले आहे. (Rohit Sharma Wife)

Back to top button