CBI in Bribary Case : वीस लाख रुपयांच्या लाचखोरीप्रकरणी सीबीआयकडून पाच लोकांना अटक | पुढारी

CBI in Bribary Case : वीस लाख रुपयांच्या लाचखोरीप्रकरणी सीबीआयकडून पाच लोकांना अटक

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय रस्ते महामंडळाच्या (एनएचएआय) एका प्रादेशिक अधिकाऱ्यासोबत पाच लोकांना वीस लाख रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले इतर आरोपी मध्य प्रदेशातील भोपाळस्थित आघाडीची बांधकाम कंपनी दिलीप बिल्डकॉनशी संबंधित असल्याचे सीबीआय सूत्रांकडून आज (दि.३१) शुक्रवारी सांगण्यात आले. (CBI in Bribary Case)

Mohammed Siraj : मोहम्मद सिराजच्या ‘त्या’ प्रकारावरून सुनिल गावस्कर संतापले, कारण… (Video)

एनएचएआयच्या बंगळुरू शाखेत कार्यरत असलेला अधिकारी अकील अहमद, दिलीप बिल्डकॉनचा व्यवस्थापक रत्नाकरन साजीलाल, कार्यकारी संचालक देवेंद्र जैन, कंपनीचाच अधिकारी सुनील वर्मा व अनुज गुप्ता नावाच्या अन्य एका इसमास सीबीआयने अटक केली आहे.

दिल्ली, भोपाळ, बंगळुरू, कोचीन, गुरुग्राम आदी ठिकाणी धाडी टाकून सीबीआयने ही कारवाई केली. आरोपींकडून चार कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

सीबीआयने तपास कामासाठी आयकर खात्याचीही मदत घेतली आहे. (CBI in Bribary Case)

Back to top button