सिद्धार्थ-कियारा न्यू ईयरसाठी मालदीवकडे | पुढारी

सिद्धार्थ-कियारा न्यू ईयरसाठी मालदीवकडे

पुढारी ऑनलाईन

गेल्या काही काळामध्ये मालदीव हे जणू बॉलीवूडकरांचे दुसरे घरच झाले आहे. कामातून जरा फुरसत मिळाली की ‘बी टाऊन’चे कलाकार मालदीवची वाट धरतात. अर्थात, भारतापासून जवळचे पर्यटनस्थळ आणि पुन्हा लगेच मुंबईत येणे सहज शक्य असल्याने या ठिकाणाची निवड बॉलीवूडकर करत असावेत. तर, सालाबादप्रमाणे

‘बी टाऊन’मधील एक हॉट कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी मालदीवला रवाना झाले आहेत. हे कपल त्यांच्या डेटिंगमुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून चर्चेत आहे. दोघे सतत एकमेकांसोबत दिसून येत असतात. तथापि, रिलेशनशिपबाबत दोघांनीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

आगामी काळात भलेही ते लग्न नाही करणार; पण दोघांचे रिलेशनशिप स्टेटस ते ऑफिशियल करू शकतात. याआधी दोघांनीही एकमेकांच्या आई-वडिलांचीही भेट घेतली होती. शिवाय ‘शेरशाह’मध्ये दोघांची केमिस्ट्री चांगलीच उठावदार दिसून आली होती. असो. दोघांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर सिद्धार्थ आगामी काळात ‘मिशन मजनू’ आणि ‘थँक गॉड’मध्ये दिसणार आहे. तर, कियारा ‘भूलभुलैय्या- 2,’ ‘जुग जुग जियो’मध्ये दिसणार आहे.

Back to top button