इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता झाली ठाकरे कुटूंबाची सून; विवाहसोहळा संपन्न | पुढारी

इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता झाली ठाकरे कुटूंबाची सून; विवाहसोहळा संपन्न

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आज मंगळवारी (दि. २८) मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे यांचेशी ताज हॉटेलमध्ये विवाहबद्ध झाल्या.

निहार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे आहेत, तर अंकिता पाटील पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या असून नवी दिल्ली येथील इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या कायदेशीर सहसमितीच्या अध्यक्षा आहेत. या विवाहमुळे ठाकरे व पाटील घराण्याचे नवीन ऋणानुबंध निर्माण झाले आहे.

अंकिता पाटील व निहार ठाकरे हे उच्चशिक्षित आहेत. कोरोनाच्या निर्बंधांमुळे अत्यंत निवडक पाहुणे व नातेवाईकांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. दरम्यान, विवाहनिमित्त ताज हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा

Back to top button