ब्रेकिंग : २ जानेवारीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्थगित; एमपीएससीचा निर्णय

ब्रेकिंग : २ जानेवारीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्थगित; एमपीएससीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी २ जानेवारीची राज्यसेवा पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. २जानेवारी रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना काळात परीक्षा न झाल्याने वाढीव सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ मिळावा यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने पत्रकात म्हटले आहे.

एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, १ मार्च, २०२० ते १७ डिेसेंबर २०२१ कालावधीत वयोमर्यादा ओलांडली त्या उमेदवारांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी २८ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी १ जानेवारी रात्री ११. ५९ पर्यंत अर्ज करता येणार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरून कार्यालीयन वेळेत रक्कम भरायची आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ४ ऑक्टोंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा- 2021 आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 2 जानेवारी, 2022 रोजी पूर्व परीक्षा होणार होती तर मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी होणार होती. या परीक्षेची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

उपजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54 पदांसाठी राज्य सेवा परीक्षा होणार होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news