महाराणी एलिझाबेथच्या हत्येचा प्रयत्न फसला; एका भारतीयाला अटक | पुढारी

महाराणी एलिझाबेथच्या हत्येचा प्रयत्न फसला; एका भारतीयाला अटक

लंडन, पुढारी ऑनलाईन 

१०० वर्षांपूर्वी घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची सूड घेण्यासाठी ब्रिटनच्या महालात घुसून महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये एका भारतीयाला ताब्यात घेण्यात आलं आहे, असे वृत्त ‘द सन’ यांनी दिलं आहे.

या भारतीय हल्लेखोराचं नाव जसवंत सिंह चैल असून तो केवळ १९ वर्षांचाच आहे. १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटिशांकडून घडवून आणण्यात आला होता. त्यामुळे शेकडो शीख बांधव मारले गेले होते. त्याचा सूड घेण्यासाठी जसवंत सिंह शस्त्रासहीत महाराणी एलिझाबेथ यांच्या महालात घुसला होता.

जसवंत सिंह यांनी महालात जाताना मास्क आणि हुडीचा वापर केलेला होता. लंडन पोलिसांना त्याला अटक केली आहे. जसवंत सिंह चैलच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबत त्याला वैद्यकिय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आलेला आहे.

या व्हिडीओमध्ये जसवंत सिंह शस्त्रासहीत दिसत आहे. जसवंत सिंह खानं ख्रिसमसच्या दिवशी सकाळी स्नॅपचॅटवर एक व्हिडीओ अपलोड केलेला होता. त्यात आपला आवाज लपविण्यासाठी त्याने फिल्टरचा वापरदेखील केलेला होता. ब्रिटीश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जसवंत सिंह हा सीसीटीव्हीमध्ये दिसून आला. तो भिंत ओलांडून प्रवेश करत असताना पकडला गेला आहे.

“मी एक भारतीय शिख आहे. माझं नाव जसवंत सिंह चैल आहे. माझं नाव डार्थ जोन्स आहे. मला माफ करा. मी जे काही केलं आणि जे काही करणार आहे त्यासाठी मला माफ करा. मी क्वीन एलिझाबेथ यांच्या हत्येचा प्रयत्न करणार आहे. हा १९१९ च्या जालियनवाला बाग नरसंहारात ठार झालेल्या लोकांचा सूड असेल”, असं त्यांनं त्या व्हिडीओमध्ये म्हंटलेलं आहे.

१३ एप्रिल १९१९ रोजी पंजाबमधील अमृतसरमध्ये जालियनवाला बाग येथे ही हत्याकांडाची घटना घडलेली होती. त्यामध्ये शेकडो जणांवर जनरल डायर या ब्रिटीश अधिकाऱ्याकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये ३७९ जणांचा मृत्यू झाला, तर १२०० जण जखमी झाले होते.

पहा व्हिडीओ : मनस्वी प्रेम करणाऱ्या त्या दोघांना शाहू महाराजांनी एकत्र आणलं

Back to top button