सूर्या इन्व्हेस्टमेंटवर ईडीची कारवाई; 38 कोटींची संपत्ती जप्त

सूर्या इन्व्हेस्टमेंटवर ईडीची कारवाई; 38 कोटींची संपत्ती जप्त
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्यात नागपुरातील श्री सूर्या इन्व्हेस्टमेंट्स कंपनीवर ईडीने गुरूवारी (दि.६) कारवाई केली. यावेळी या कंपनीची ३८.३३ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली.

समीर जोशो संचालित सूर्या कंपनीने एक दशकापूर्वी ग्राहकांना अधिकाधिक परतावा देण्याचे आमिष देत सार्वजनिक निधी गोळा केला. निर्धारित मुदतीनंतर परतफेड न झाल्याने शेवटी हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याने हा घोटाळा उघडकीस आला.

ईडीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, फसवणूक केलेल्या निधीचा वापर करून मिळवलेली मालमत्ता नागपूर, अमरावती आणि अकोला तसेच गोव्यातील मडगाव येथे असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही तात्पुरत्या स्वरुपातील मालमत्ता जप्तीची कारवाई राज्य पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सुरू केलेल्या खटल्यातून झाली आहे.दहा वर्षांपूर्वी सूर्याचे प्रवर्तक समीर जोशी यांना अटकही झाली होती.

 ईडी नागपूरने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि गोव्यातील सूर्या इन्व्हेस्टमेंट्सच्या मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तात्पुरत्यारित्या संलग्न करण्यात आल्या आहेत. दोन्ही एजन्सी समन्वय साधत पुढील पावले उचलणार आहेत.

ईओडब्ल्यूनुसार, समीर जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायद्यांतर्गत (एमपीआयडीए) आरोप ठेवण्यात आले आहेत. गुंतवणुकदारांना परतफेड करण्यासाठी संलग्न मालमत्तेची विक्री चाचणी पूर्ण झाल्यानंतर आणि गुन्हा सिद्ध झाल्यानंतरच पुढील कारवाई सुरू होऊ शकते.चेन मार्केटिंग, दुग्धव्यवसाय आणि स्कूल बसेस यासह विविध उपक्रमांसाठी जोशी यांनी निधी जमवला,म्युच्युअल फंड किंवा बँकांना मागे टाकून परतावा दिला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गुंतवणूक झाली. समीर जोशी आणि त्यांची पत्नी पल्लवी हे दोघेही EOW ने अटक केल्यानंतर सध्या जामिनावर बाहेर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news