Indonesia Earthquake : इंडोनेशियाला भूकंपाचा तीव्र धक्‍का, त्‍सुनामीचा इशारा | पुढारी

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला भूकंपाचा तीव्र धक्‍का, त्‍सुनामीचा इशारा

जकार्ता : पुढारी ऑनलाईन

इंडोनेशियाला आज पहाटे भूकंपाचा तीव्र धक्‍का बसला. ( Indonesia Earthquake ) रिश्‍टर स्‍केलवर याची तीव्रात ७.७ इतकी नोंदवली गेली आहे. हवामान विभागाने त्‍सुनामीचा इशाराही दिला आहे.

Indonesia Earthquake : त्‍सुनामीसह भुस्‍खलनचाही धोका

इंडोनेशियाच्‍या पूर्व नुसा टेंगारा येथे ७.७ रिश्‍टर स्‍केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्‍का ( Indonesia Earthquake ) जाणवला. याचा केंद्रबिंदू हा मैमेरे शहरापासून १०० किलोमीटर उत्तर समुद्रात १८.५ किलोमीटर होता. पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी हा धक्‍का जावणला. यामुळे भूकंप केंद्रापासून एक हजार किलोमीटर अंतरावर असलेल्‍या किनारपट्‍टीला त्‍सुनामीचा धोका असल्‍याचे इंडोनेशियाच्‍या हवामान विभागाने म्‍हटलं आहे. या परिसरात भुस्‍खलनचाही धोका असून यामुळे मोठे नुकसान होवू शकते, असा इशाराही देण्‍यात आला आहे.

२००४मध्‍ये इंडोनेशियाच्‍या सुमात्रा येथे ९,१ रिश्‍टर स्‍केल तीव्रतेचा भकंप झाला होता. या नैसर्गिक आपत्तीमध्‍ये इंडोनेशियात सुमारे १ लाख ७० हजार नागरिकांचा मृत्‍यू झाला होता. तर दक्षिण आशियातील दोन लाख २० हजार लोक मृत्‍युमुखी पडले होते. ही आपत्ती मानवी इतिहासातील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्तीपैकी एक होती.

मे २०२१ मध्‍ये सुमात्रा बेटावर ६.६ रिश्‍टर स्‍केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. इंडोनेशिया देश हा भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. येथे सातत्‍याने भूकंपाचे धक्‍के जाणवत असतात.

हेही वाचलं का? 

 

Back to top button