टाईमपास म्‍हणून काढलेल्‍या ‘त्‍या’ लॉटरीच्या तिकिटाने रातोरात बनला कोट्यधीश

टाईमपास म्‍हणून काढलेल्‍या ‘त्‍या’ लॉटरीच्या तिकिटाने रातोरात बनला कोट्यधीश

न्यूयॉर्क : कधी कधी एखादी चूकही पथ्यावर पडू शकते. अमेरिकेतील एका माणसाबाबत असेच घडले. त्याने एकाच लॉटरीची चुकून दोन तिकिटं खरेदी केली, मात्र त्याला साडेपाच कोटी रुपयांची लॉटरी लागली!

उत्तर कॅरोलिना राज्यात राहणार्‍या स्कॉटी थॉमस नावाच्या व्यक्तीचे नशीब असे एका चुकीमुळे फळफळले. स्कॉटीने चुकून लॉटरीची दोन तिकिटे खरेदी केली होती. खरे तर निव्वळ टाईमपास म्हणून त्याने लॉटरी तिकीट खरेदी केले होते. घरी बसल्या बसल्या त्याने 'लॉटरी फॉर लाईफ'चे एक तिकीट घेण्याचे ठरवले. लॉटरीसाठी त्याने ऑनलाईन डिटेल भरण्यास सुरुवात केली.

त्याने चुकून दोनवेळा डिटेल्स भरून तिकीट खरेदी केले. त्याने केलेली ही चूक दुसर्‍या दिवशी त्याच्या मुलाने निदर्शनास आणून दिली. एकाच लॉटरीची दोन तिकिटं का घेतली असे मुलाने विचारल्यावर त्याला आपली चूक समजली! या चुकीचे त्याला वाईटही वाटले. मात्र, चुकून खरेदी केलेल्या या दोन्ही तिकिटांवर त्याला लॉटरी लागली त्यावेळी त्याला खरेच वाटेना! तो रातोरात कोट्यधीश बनला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news