nusrat jahan : बोल्ड फाेटाे शेअर केल्‍याने तृणमूलच्‍या खासदार नुसरत जहाँ ट्राेल | पुढारी

nusrat jahan : बोल्ड फाेटाे शेअर केल्‍याने तृणमूलच्‍या खासदार नुसरत जहाँ ट्राेल

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ ( nusrat jahan ) निखिल जैनपासून विभक्त होण्यापासून ते मुलाला जन्म देण्यापर्यत घडलेल्या घटनेमुळे चर्चेत आल्या होत्या. तर सध्या शेअर केलेल्या एका फोटोंनी त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे त्यांचे फोटो पाहून काही नेटकरी भडकले आणि तिला ट्रोल करू लागले. हवाई दलाच्या हेलिकाॅप्‍टरला अपघात झालाय आणि तुला काय सुचतयं…अशा शब्‍दांमध्‍ये नेटकर्‍यांनी नुसरत जहाँ यांना सुनावले.

नुसरत जहाँ ( nusrat jahan ) यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर बोल्ड लुकमधील दोन फोटो शेअर केले. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘From the archive’ असे लिहिले आहे.  #थ्रोबॅक असा हॅशटॅगही दिला. यावरून नुसरत यांचा हा जुना फोटो असल्याचे चाहत्यांनी कयास लावला तर या फाेटाेमुळे काही नेटकऱ्यांनी नुसरत यांना चांगलेच धारेवर धरत ट्रोल केले.

तामिळनाडूमध्ये हवाई दलाच्‍या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशावर शाेककळा पसरली असताना खासदार नुसरत जहाँ थ्रोबॅक फोटो शेअर करत आहेत, हे चुकीचे असल्‍याचे एकाने म्‍हटलं आहे.

दुसऱ्या एका नेटकऱ्यांने ‘देशात काय चाललंय आणि खासदार थ्रोबॅक हॉट फोटो शेअर केलाय. हवाई दलाचे हेलिकाॅप्‍टरला अपघात झालाय आणि तुम्‍हाला काय सुचतयं, असे त्‍यांना सुनावले. तर  आणखी एकाने ‘तुम्ही खासदार असून मर्यादेचे पालन करा’ असे देखील म्हटले आहे. नुसरत जहाँ या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आल्‍या हाेत्‍या.

हेही वाचलंत का? 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

Back to top button