‘गुन्हे दडवायला तत्परतेने येतात, सोडवायला मात्र..’ पुणे पोर्शे कार दुर्घटनेवर मराठी दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट | पुढारी

'गुन्हे दडवायला तत्परतेने येतात, सोडवायला मात्र..' पुणे पोर्शे कार दुर्घटनेवर मराठी दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील पोर्शे कार दुर्घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बेदकारपणे गाडी चालवणाऱ्याने पुण्यात पोर्शे कारने दोघा निष्पाप व्यक्तींना चिरडलं. त्यानंतर ज्या अल्पवयीन मुलाच्या हातून ही घटना घडलीय, त्याला जामिनावर सोडण्यात आले. हे वृत्त समोर येताच, सर्व स्तरातून या घटनेचा निषेध तर होत आहेच, शिवाय अनेकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामध्ये कला विश्वातील दिग्गजदेखील मागे नाहीत. या प्रकरणावर मराठी दिग्दर्शक – लेखक क्षितीज पटपर्धनने संतप्त पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

  • पुण्यात रविवारी (दि.१९) पहाटे भऱधाव पोर्शे कारने दोघांना चिरडले. यात तरुण-तरुणी ठार झाले होते.
  • संशयित आरोपी अल्पवयीन असून ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे.
  • मुलाकडे वाहन परवाना नसताना वडिलांनी पोर्शे कार त्याला चालवायला दिली होती
  • अपघातातील पोर्शे कार विनानोंदणीच रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर

मुंबईत होर्डींग असो किंवा पुण्यात गाडी, या देशात गुन्हा दडवायला जेवढ्या तत्परतेने सिस्टीम एकत्र येते, तेवढी सोडवायला येत नाही हे खरं दुर्दैव आहे. आपण नाव, जागा बदलत श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या फक्त!” – क्षितीज पटवर्धन

क्षितीज पटवर्धनच्या पोस्टवर अनेकांनी समर्थन दिले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या

कारच्या स्पीड लॉकने वेग नोंदवला

“पोर्शे टायकनच्या पंचनाम्यादरम्यान असे दिसून आले की, जेव्हा कार मोटरसायकलला धडकली तेव्हा तिचा वेग १६० किमी प्रतितास होता. कारच्या स्पीड लॉकने धडकेच्या वेळी शेवटचा वेग दर्शविला आहे,” असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.

वडिलांसह पाच जणांवर गुन्हा

पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील, ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह हॉटेल मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेलचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर अशा चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल अग्रवाल यांना आज (दि.२१) सकाळी संभाजीनगर येथून अटक करण्‍यात अआली आहे.

हेदेखील वाचा-

 

 

Back to top button