bbm : सोनाली-मीनल यांचा भन्नाट डान्स ! | पुढारी

bbm : सोनाली-मीनल यांचा भन्नाट डान्स !

पुढारी ऑनलाईन

जेव्हापासून बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर लिलिपुट नगरात करण्यात आले आहे तेव्हापासून सदस्यांची झोप उडाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. घरामध्ये हुकूमशहा कठीण कठीण टास्क या सदस्यांना सोपवत आहेत आणि त्यामुळे त्यांची तारांबळ उडत आहे. नुसते टास्कचं नाही तर त्यांना शिक्षा देखील भोगावी लागत आहे. आज उत्कर्ष आणि विशालच्या संयमाची कसोटी लागणार आहे. तर दुसरीकडे घरात बघायला मिळणार आहे. सोनाली-मीनल यांचा भन्नाट डान्स. सोनाली-मीनल यांनी चिकनी चमेली या गाण्यावर धम्माल नृत्य सादर केले.

उत्कर्ष आणि विशाल यांना हुकूमशहा आज एक कठीण टास्क देणार आहेत. या कसोटीमध्ये ग्लासमधील दही आणि त्यातील मिश्रण दोघांना हात न लावता पूर्ण खायचे आहे. जो सदस्य लवकर पोहचणार आहे त्याला संधी प्राप्त होणार आहे. आता ही कुठली संधी मिळणार आहे हे आज कळेलच.

sonali patil and minal shah
sonali patil and minal shah

बघूया आज सदस्यांनी काय काय धम्माल केली ते आजच्या भागामध्ये. पाहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलं का? 

Back to top button