Kisan Andolan : तब्बल ३७८ दिवस चाललेलं शेतकरी आंदोलन अखेर मागे | पुढारी

Kisan Andolan : तब्बल ३७८ दिवस चाललेलं शेतकरी आंदोलन अखेर मागे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून तब्बल ३७८ दिवस चाललेल्या शेतकरी आंदोलन (Kisan Andolan) संपविण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या, त्यावर केंद्रीय कृषी सचिवांच्या सहीचे पत्र आल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने बैठक घेऊन आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यामुळे त्याचा आनंद आणि जल्लोष शनिवारी धरणे स्थळावर आणि टोल नाक्यावर करण्यात येणार आहे. संयुक्त किसान मोर्चाची या पुढची आखणी करण्यासाठी १५ जानेवारी रोजी दिल्लीत बैठक होणार आहे.

यावेळी संयुक्त किसान मोर्चाने डाॅक्टर, वकील, सोशल मीडिया, माध्यमं आणि कलाकार या सर्वांचे आभार मानले. या आंदोलनाचे श्रेय शहीर शेतकऱ्यांनी समर्पित करण्यात येत आहे, असं मत संयुक्त किसान मोर्चाचे केंद्रीय सदस्य संदीप आबा गिड्डे-पाटील यांनी मांडले.

जगभरात या शेतकरी आंदोलनाची (Kisan Andolan) दखल घेण्यात आली. अनेक हाॅलिवुड आणि बाॅलिवुड कलाकारांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. देशातही त्याचे पडसाद उमटले आणि विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घटना घडल्या. तब्बल ३७८ दिवस केंद्र सरकारच्या विरोधात हे चालल्यानंतर केंद्राने कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणी केली.

पण, शेतकऱ्यांनी अशी भूमिका घेतली की, घटनात्मक पद्धतीने हे कायदे जोपर्यंत मागे घेतले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. शेवटी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत कृषी कायदे मागे घेण्यावर शिक्कामोर्तब झाले, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा येथे पारित करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रपतींची त्यावर सही झाली आणि हे शेतकरी आंदोलन यशस्वी झालं.

पहा  व्हिडीओ : जनरल बिपीन रावत : गोरखा रायफल्‍स ते देशाचे पहिले सीडीएस

Back to top button