Ravi Shastri: विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रवी शास्त्रींचे मोठे वक्तव्य, म्हणाले… | पुढारी

Ravi Shastri: विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रवी शास्त्रींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

मुंबई; पुढारी ऑनलाईन : टीम इंडियाच्या वनडे संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीची (Virat Kohli) उचलबांगडी केली आहे. काल (दि. ८) बीसीसीआयने याबाबत महत्त्वाची घोषणा करत रोहित शर्माच्या खांद्यावर वनडे संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच बीसीसीआयने द. आफ्रिका दौ-यासाठी १८ जणांचा भारतीय कसोटी संघ जाहीर केला. या संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडेच ठेवण्यात आले आहे. दरम्यान, विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे संघाच्या कर्णधार पदावरून हटवल्यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्याच्या निर्णयाला त्यांनी योग्य ठरवले असून रोहित संघासाठी जे सर्वोत्तम आहे ते करतो, असे म्हटले आहे.

विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्याच्या निर्णयाला त्यांनी योग्य ठरवले असून रोहित संघासाठी जे सर्वोत्तम आहे ते करतो असे म्हटले आहे.

विराट कोहलीची (Virat Kohli) वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून त्याच्या जागी रोहित शर्माची (Rohit Sharma) वनडे संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोहलीने याआधीच टी-२० चे कर्णधारपद सोडले होते आणि आता त्याला वनडेच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत याची माहिती दिली.

रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमी संघाच्या हिताचाच विचार करतो – रवी शास्त्री (Ravi Shastri)

रोहित शर्माला वनडेचे कर्णधारपद मिळाल्यावर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘रोहित शर्मा नेहमीच संघासाठी जे सर्वोत्तम आहे ते करतो. खेळाच्या सर्वोत्तम प्रदर्शनासाठी तो संघातील प्रत्येक खेळाडूचा पुरेपूर फायदा घेतो. रोहित आणि विराट कोहली हे एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही क्रिकेटच्या प्रकारांमध्ये महान खेळाडू आहेत. सध्याच्या संघाकडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीत पराभवाची धुळ चारली होती.’

विराट कोहली आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) एकमेकांच्या खूप जवळ होते. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर कोहलींमुळेच रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि दोघेही एकमेकांचे खूप कौतुक करतात. मात्र, रवी शास्त्रींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता विराट कोहलीही केवळ एकाच फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार राहिला आहे.

टीम इंडियाच्या वनडे संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटनेही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, विराट दीर्घकाळापासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये विशेष अशी फलंदाजी करू शकलेला नाही. त्याचबरोबर विराटवरील दबाव कमी करण्यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला असावा, असे त्याने म्हटले आहे.

बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार्‍या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटला वनडे संघाचे कर्णधार पद सोडण्यास सांगितले होते अशी माहिती समोर येत आहे. विराटला या निर्णयावर विचार करण्यासाठी ४८ तासांचा अवधीही देण्यात आला होता, पण विराटने याबाबतचा कसलाच फिडबॅक दिला नाही. अखेर बीसीसीआयला आपली शक्ती वापरावी लागली. काल (दि. ८) मंडळाने मोठा निर्णय जाहीर करत टीम इंडियाच्या वनडे संघाच्या कर्णधार पदी मुंबईकर रोहित शर्माला विराजमान करण्यात आले. याच बरोबर बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहलीकडे ठेवण्यात आले.

बीसीसीआयने घेतलेल्या कर्णधार पदाच्या फेरबदलाच्या निर्णयावर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, विराट कोहली कसोटी क्रिकेटची पूजा करतो. ही गोष्ट बाकीच्यांना आश्चर्यचकित करू शकते, कारण त्यांना भारतात आयपीएल आणि एकदिवसीय क्रिकेटला प्राधान्य मिळत आहे. संघातील सर्वच खेळाडूंना विचारल्यावर तुम्हाला समजेल की, ९९ टक्के खेळाडूंच्या आवडीचा क्रिकेट प्रकार हा कसोटी हाच आहे. कदाचित यामुळेच भारतीय संघ या फॉरमॅटमध्ये गेली ५ वर्षे सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आम्ही कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात हरलो असलो तरी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची नोंद केली आहे आणि इंग्लंडमध्येही आम्ही चांगली कामगिरी केली आहे’, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

अलीकडच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय कसोटी संघाची कामगिरी चांगली झाली आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात दोन वेळा कसोटी मालिका जिंकली आहे. त्याचबरोबर इंग्लंडमधील कसोटी मालिकेतही टीम इंडिया २-१ ने पुढे होती. मालिकेतील शेवटची कसोटी पुढील वर्षी खेळवली जाणार आहे. रवी शास्त्री यांनी स्वतः प्रशिक्षक असताना टीम इंडियाच्या कामगिरीची आलेख उंचावला.

Back to top button