Serial killer : आधी बिर्याणी खाल्ली, नंतर ४१ लोकांच्या हत्येची दिली कबुली  | पुढारी

Serial killer : आधी बिर्याणी खाल्ली, नंतर ४१ लोकांच्या हत्येची दिली कबुली 

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या इतिहासात ६० शतकात अंगावर काटा आणणारा एक सनकी सीरियल किलर (Serial killer) होऊन गेला… ज्याचं नाव जरी ऐकलं तरी झोपडपट्टीतील लोकांच्या तोंडचं पाणी पळायचं… तो मध्यरात्र गाठू फूटपाथवर झोपलेल्या बायकांना, माणसांना आणि लहान मुलांनाही गायब करायचा आणि त्यांची हत्या करायचा… त्याची दहशत इतकी पसरली होती की, २००० पोलिसांचा ताफा रात्री पेट्रोलिंगच्या कामाला काम लावण्यात आले… तरीही हा माणसांची कत्तर करायचा थांबला नाही… ४१ हून गोरगरीबांची याने हत्या केली होती… मुंबईच्या गुन्हेगारीच्या इतिहासात याचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही… कोण आहे का… कुठून आला… सीरियल किलर का झाला… आणि त्याचा शेवट कसा झाला, या प्रश्नांच्या उत्तरातून आपण ‘या’ सीरियल किलरचा इतिहास जाणून घेऊ…

कोण आहे हा सीरियल किलर अन् कशा केल्या त्याने हत्या?

मूळ नाव रमण राघव. एक तामिळ ब्राह्मण. अंगाना दणकट. सिन्धी दलवाई, तलवाई, अन्ना, थाम्बी, वेलुस्वामी, एक ना नावांनी त्याला ओळखलं जात होतं. त्यांचं शिक्षण झालं नव्हतं, तो बेघर होता… असं सांगितलं जातं की, त्यानं खूप वर्षे पुण्याच्या जंगलात घालवली होती.

सीरियल किलर (Serial killer) होण्यापूर्वीच आपल्याच बहिणीवर बलात्कार करून तिची धारदार चाकून हत्या केल्यामुळे रमन राघन ५ वर्षांची शिक्षा भोगून आलेला. त्याने ४१ हत्या केलेल्या होत्या. या हत्या त्याने दोन टप्प्यात केल्या. पहिला टप्पा होता १९६५-६६ चा आणि दुसरा टप्पा होता १९६८ चा.

रमन राघवन हा रात्रीचा शहरात फिरायचा. फूटपाथवर झोपलेल्या माणसांचं अपहरण करायचा किंवा झोपलेल्या अवस्थेतच धारदार शस्त्राने झोपलेल्या लोकांवर हल्ला करायचा. हल्ला करताना संबंधिताच्या डोक्यावर पहिल्यांदा लोखंडी हत्याराने जोरात हल्ला करायचा आणि त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांची हत्या करायचा.

Raman Raghavan

एका पाठोपाठ एक हत्येचा हा सिलसिला सुरू होता. त्याची दहशत इतकी निर्माण झाली की, लोकांमध्ये त्याच्या अख्यायिका निर्माण झाल्या होता. कोणी म्हणायचं परग्रहातून एक माणूस येतो आणि लोकांची हत्या करतो, तर कुणी म्हणायचं की एक सुपरपाॅवर आहे ती मांजर किंवा पोपटाच्या रुपात येऊ लोकांची हत्या करतो आहे.

१९६५ च्या टप्प्यात एकूण १९ लोकांवर हल्ला केला. त्यामध्ये ९ जणांची हत्या झाली. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, त्याच्याविरोधात कोणताही पुरावा मिळाला नसल्यामुळे त्याला सोडून देण्यात आलं. १९६८ च्या दुसऱ्या टप्प्यात अनेक लोकांच्या त्याने हत्या केल्या.

एकूण २७ लोकांवर त्यांनी हल्ला केला होता. त्याच्या तावडीतून निसटून आलेल्या लोकांना पोलिसांनी त्याचं वर्णन सांगितलं, त्याच्या आधारे स्केच तयार केले, त्यावरून एलेक्स फिआल्हो नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने रमन राघवनची ओळख पटली.

दरम्यान, १९६५ मध्ये गुन्हे शाखेत रमाकांत कुलकर्णी नावाचे अधिकारी नव्याने रुजू झाले. त्यांनी रमन राघवनच्या सीरियल किलिंगच्या केसचा तपास सुुरू केला. बरेच जण म्हणून लागले कुलकर्णी यांनी म्हणावा तसा अनुभव नाही. असे असताना कुलकर्णी यांनी रमन राघवनला पकडले. रमाकांत कुलकर्णी यांच्या ‘फूटप्रिंट ऑन द सॅण्ड ऑफ क्राईम’ या पुस्तकात या केसचं वर्णन वाचायला मिळतं.

गुन्हा कबुलीचा ‘त्याचा’ मजेदार किस्सा

रमन राघवनला पकडल्यानंतर त्याने दोन दिवस पोलिसांशी काहीच बोलला नाही. जेव्हा त्याला पोलिसांनी विचारले की, तुला काही हवे आहे का… तेव्हा त्याने तिसऱ्या दिवशी तोंड उघडले. त्याने पोलिसांना थेट ‘कोंबडा’ खायला हवा आहे, असं सांगितलं. पोलिसांनी त्याची इच्छा पूर्ण केली.

त्यानंतर पुन्हा त्याला विचारलं की, आणखी काही हवं आहे का… त्यावेळी त्याने चिकन बिर्याणी खाण्याची इच्छा व्यक्ती केली. तिसऱ्यांदा तर त्याने चक्क संभोग करण्यासाठी एक स्त्री द्या, अशी मागणी केली. त्यानंतर केसांच तेल, कंगवा आणि आरसा याची मागणी केली. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यात आल्या.

Raman Raghavan

त्याने पोलिसांनी दिलेले नारळाचे तेल सर्व अंगाला लावले. हे तेल लावताना तेलाच्या सुगंधाचे त्याने कौतुक केले. नंतर आरशामध्ये डोकावून कंगव्याने डोक्याचे केस विंचरले. व्यवस्थित तयार झाल्यानंतर रमनने पोलिसांना विचारले की, तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे?

पोलीस उत्तरले की, हत्यासंदर्भातील सर्व माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली. नंतर त्याने पोलिसांनी घेऊन त्या जंगलात गेला, तिथे माणसांची हत्या करण्याची हत्यारं पुरू ठेवली होती. एक धारदार चाकू आणि इतरही काही साहित्य पोलिसांना त्यानं दिलं. पोलिसांसमोर त्याने ४१ खून केल्याची कबूल दिली.

…मनोरुग्ण असल्याचे सिद्ध

रमन राघवनला जेव्हा कोर्टात हजर करण्यात आले, तेव्हा तो मनोरुग्ण असल्याचा युक्तीवाद त्याच्या वकिलाने केला. त्यामुळे रमनला डाॅक्टरांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. १ महिना त्याला डाॅक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात आले होते. डाॅक्टरांनी रमन तंदुरुस्त आहे आणि तो वेडा नाही, असा अहवाल दिला.

त्यामुळे त्याला मृत्यूची शिक्षा झाली. मात्र, शिक्षा देण्यापूर्वी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा करण्यापूर्वी मुंबईच्या जनरल सर्जनला सांगितले की, त्यांनी तीन मनोविकारतज्ज्ञांनी टीम बनवावी आणि रमन वेडा नाही, याची खात्री करावी. या मनोविकारतज्ज्ञांनी पाच वेळा मुलाखत घेतली. २-२ तास ही मुलाखत झाली. त्यात तो मनोरुग्ण असल्याचे सिद्ध झाले.

Raman Raghavan

रमन डाॅक्टरांसमोर काय म्हणाला…

अकबराचे सरकार, ब्रिटिश सरकार आणि काॅंग्रेस सरकार, असे तीन सरकार असून याच सरकारने मला आमिष दाखवून हत्या घडवून आणण्यास भाग पाडले. तसेच काही माणसं माझं लिंग बदलून मला स्त्री करण्याचा प्रयत्नात होते, पण मी त्याचा प्रयत्न हाणून पाडला. माझ्याकडे एक शक्ती आहे.

मी १०० टक्के पुरुष आहे, हेच तो डाॅक्टरांना सतत सांगत होता, या त्याच्या विचित्र दाव्यांमुळे डाॅक्टरांनी त्याला मनोरुग्ण असल्याचे घोषीत केले. त्यामुळे त्याची मृत्यू शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. येरवडा तुरुंगात त्याला पाठविण्यात आले. १९९५ साली पुण्याच्या ससून रुग्णालयात किडनीच्या आजारात खतरनाक सीरियल किलरचा अंत झाला.

हे ही वाचा…

Back to top button